‘RRR’ चित्रपटाने तोडला ‘बाहुबली २’ चा रेकॉर्ड, केली कोटींची कमाई!

0
390
'RRR' breaks 'Baahubali 2' record, earns crores

दाक्षिणात्य चित्रपट सिनेपडद्यावर नुसता धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यातच नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘RRR’ हा कोटींच्या घरात पोहचला आहे. या चित्रपटाने वर्ल्ड वाईड फेमस चित्रपट ‘बाहुबली २’ देखील मागे टाकले आहे. ‘RRR’ दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अवघ्या काही दिवसात ९३९.४१ कोटींची कमाई केली आहे.

RRR हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर २५ मार्चला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच अनेक चाहत्यांना ‘आरआरआर’ चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे या चित्रपटाने आतापर्यंत १२ दिवसात तेलुगू भाषेत ३५३ कोटींची कमाई केली आहे. तर तामिळमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ६५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यापाठोपाठ कन्नड भाषेत ७५ कोटींचा कमाई या चित्रपटाने केली आहे. तर हिंदीमध्ये डब असलेल्या या या चित्रपटाने १९६ कोटींचा गल्ला कमावला आहे.

rrr film in hindi

RRR चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमध्ये ७०० कोटी रुपयांचा गल्ला जमवेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले होते. तसेच हा चित्रपट ‘बाहुबली २’चा ८०० कोटींचा रेकॉर्ड मोडू शकणार नाही, असेही तज्ञांचे म्हणणे होते. मात्र या चित्रपटाने आतापर्यंत हे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. या चित्रपटाने जगभरात पहिल्याच आठवड्यात ७०९.३६ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत १२ दिवसात या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ९३९.४१ कोटींची कमाई केली आहे.

Leave a Reply