आजपर्यंत विविध कला क्षेत्रात अनेक कलाकार आप आपल्या कला क्षेत्रात अजरामर झाले. बॉलिवूड मधील एक असे अप्रतिम अभिनेते ज्यांनी बॉलीवूड मध्ये एन्ट्री घेऊन अनेक भूमिका रंगवल्या आहे. मग ते १९७० मधील मेरा नाम जोकेर असो, किंवा २०१२ मधील अग्नीपथ असो… आपण ज्या व्यक्ती बद्दल बोलत आहोत ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर.

ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्री ला आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. ऋषी कपूर हे मागील २ वर्षांपासून कॅन्सर या आजाराने त्रस्त होते. अमेरिकेत जाऊन त्यांनी या कॅन्सर च्या आजारावर उपचार सुद्धा केले, पण ३० एप्रिल २०२० ह्या दिवशी आपल्यातून एक अप्रतिम अभिनेते अपल्यांना सोडून गेले. त्यांच्या ह्या प्रवासात त्यांची पत्नी नितु सिंग म्हणजेच नितु कपूर यांनी त्यांना मोलाची साथ दिली.
ऋषी कपूर व नितु कपूर यांच्या नात्यातील अनेक महत्वाच्या पण जगासमोर न आलेल्या अशा अनेक घटनांवर किंवा क्षणांवर आपण प्रकाश टाकणार आहोत.

ऋषी कपूर हे ९०sss चे चॉकलेट हिरो म्हणून ओळखले जात. तर नितु कपूर ह्या सुंदर, साध्या आणि सरळ अभिनेत्री. ऋषि कपूर व नितु सिंग या जोडीने ९०ss च्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले आहेत. एकत्र सिनेमा मध्ये काम करता करता त्यांची मैत्री ही प्रेमामध्ये कधी रूपांतर झाली हे त्या दोघांना ही कळले नाही. स्क्रीनवर जे त्यांचे प्रेम दिसत होते, त्याहून अधिक खऱ्या जीवनात ते प्रेमात होते. त्या दोघांची पहिली भेट ही १९७४ रोजी जहिरीला “इनसान” या चित्रपटाच्या सेटवर झाली. नितु ह्या अवघ्या १४ वर्षाच्या असताना त्यांनी बॉलीवूड मध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.
ऋषि कपूर व नितु यांची सेटवर मात्र फार थट्टा मस्करी करीत असतं. यातूनच त्यांच्या प्रेमाची सुरवात झाली. एकदा तर ऋषी कपूर एका चित्रपटाच्या शूटिंग साठी पॅरिस येथे गेले होते, तेव्हा त्यांना तिथे नितुच्या खूप आठवण येऊ लागली. त्यावेळेस ऋषी यांनी नितुला टेलिग्राम पाठवून आपले अबोल प्रेम व्यक्त केले. नितु यांनी ही त्या टेलिग्राम चा होकार दिला. त्या वेळी दोघे ही खूप आनंदात होते, पण नितु कपूर यांच्या आईला ऋषी व नितु यांचं प्रेमाचं नातं मान्य नव्हतं, कारण नितु ह्या अवघ्या १५-१६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या करियरची आता कुठे सुरवात झाली होती. ऋषी व नितु यांच्या नात्या

ची चर्चा इंडस्ट्री मध्ये होऊ नये, असे नितुच्या आईला वाटत. त्या गिष्टीमुळे नितु च्या करियर वर परिणाम होईल. जेव्हा नितु व ऋषी डेटवर जातं तेव्हा नितुच्या आई त्यांच्या चुलत भावाला त्यांच्या सोबत पाठवत असतं. दोघे ही प्रेमरोगी मात्र ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी ऋषी यांनी नितुशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा नितु यांच्या आईने स्वखुशीने त्यांच्या लग्नासाठी परवानगी दिली.
ऋषी सोबत विवाह होणार या गोष्टीमुळे नितु प्रचंड खुश होती, पण एक बाजूला त्यांना त्यांच्या आई ची चिंता सतावत होती. “नितु यांच्या लग्नानंतर त्यांच्या आईची काळजी कोण घेणार?” हा प्रश्न नितुच्या मानत घर करून बसला, कारण संपूर्ण घराची जबाबदारी ही नितु ह्यांच्या खांद्यावर होती. ही गोष्ट ऋषी यांनी ओळखली व नितुच्या आईला लग्नानंतर सोबत राहण्याची विनंती केली. २२ जानेवारी १९८० रोजी नितु सिंग व ऋषी कपूर हे दोघे विवाह बंधनात कायमचे अडकले. अशा पद्दती ने नितु यांच्या प्रेमापोटी ऋषी यांनी नितु यांच्या आईची मोठी जबाबदारी स्वीकारली.