ऋषी कपूर यांच्या या दोन इच्छा राहिल्या अपूर्ण

0
614

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर आता आपल्यासोबत नाहीत, परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही इच्छा देखील अपूर्ण राहिल्या. ऋषी कपूर यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी एका मुलाखतीत आपल्या इच्छेचा उल्लेख केला होता. ऋषी कपूर यांनी उल्लेखलेल्या २ जिवंत आहे तो पर्यंत आपल्या या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे म्हटले होते. पण त्यांच्या अचानक न=जाण्याने त्यांच्या या दोन्ही इच्छा अपूर्ण राहिल्या-

Kapoor-famliy-Haveli-Peshawar

पहिली इच्छा

ऋषी कपूरची पहिली इच्छा होती की त्यांनी आपल्या कुटूंबातील सर्वानी त्यांची पेशावर स्तिथ हवेली पहिली पाहिजे. ऋषी कपूर यांचे आज्जा पृथ्वीराज कपूर आणि वडील राज कपूर यांचा जन्म पेशावर मधील त्यांच्या खानदानी हवेलीत झाला होता..

ऋषी कपूर या मुलाखतीत असे म्हटले होते कि त्यांचे आजोबा एक सामान्य व्यक्ती होते तरी देखील त्यांनी एवढी चांगली हवेली कशी बांधली याचे त्यांना आश्चर्य वाटत. त्यांची इच्छा होती कि त्यांचा मुलगा रणबीर न त्याचा मुलांसह पेशावर मधील या हवेलीत जावं, त्यांना ती हवेली दाखवावी.. ते म्हणाले होते कि आपलं मूळ या जागेशी जोडलेलं आहे.. आपण बघूच रणबीर कपूर त्यांची हि इच्छा कधी पूर्ण करतो..

दुसरी इच्छा

ऋषी कपूर दुसर्‍या अपूर्ण इच्छेबद्दल जर आपण चर्चा करायची म्हटली तर ती देखील रणबीर कपूरशीच जोडली आहे.. या बाप लोकांचे नातं खूप वेगळं होत. ते प्रत्येक अडचणीत एकमेकांसोबत असायचे. ऋषी कपूर यांना त्यांच्या मृत्यपूर्वी रणबीरच लग्न बघायचं होत.. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “रणबीर कपूरनेही आता सेटल व्हावे अशी मला इच्छा आहे. ‘रणबीर ने लवकर लग्न करावे आणि लवकर मूल व्हावीत, म्हणजे मी नातवंडांसोबत माझं म्हातारपण घालवायला मोकळा झालो..’

Leave a Reply