टिकटॉक स्टार समीर गायकवाड ह्याची आत्महत्या

0
713
sameer gaikwad sucide story reallity sad news accident fan girlfriend insa tik tok sta

‘स्टार’ ! काय गम्मत आहे ना ह्या शब्दात! चांगल्या चांगल्या ना भुरळ पडणारा हा शब्द. जवळपास सर्वजण मनाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात एकदा तरी स्टार व्हावं हे स्वप्न उराशी बाळगून असतात. खरं तर ‘स्टार’ ह्या शब्दातच एक ‘झिंग’ आहे, मग ती ‘झिंग’ पुढे तुमच्या आयुष्यात केव्हा ‘झिंगाट’ घालायला लागेल हे काही सांगता येत.

सध्या सोशल मीडिया द्वारे त्वरित प्रसिद्ध होणाऱ्यांची तादाद खूप मोठ्या प्रमाणात आहे. एक छोटासा व्हिडीओ , एक छोटीशी पोस्ट, किंवा एखाद्या ललनवती ने लवलेला तिचा डोळा, तुम्हाला रातोरात ‘स्टार’ बनवू शकते. एखाद्या टी व्ही शो तुम्हाला रातोरात स्टारडम आणू देऊ शकतो.

आजकाल हे स्टारडम मिळवणे जेव्हढे सोपे झाले आहे तेव्हढेच ते पचवणे व टिकवणे खूप जास्त कठीण झाले आहे. आजकाल तरुण प्रेक्षक ही खूप चोंदखळ झालाय. ह्यांच्या कलाकृती चे आयुष्यच १०-२० सेकंद ते जास्तीत जास्त १ मिनिट एव्हढ्याच कालावधीचे झाले आहे.

आणि एकवेळा जर का ह्यांनी तुमच्या कडे पाठ फिरवली कि तुम्हाला सामोरे जावे लागते ते एक मोठ्या निराशेला. लाईम लाईट नंतर होणारा काळोख तुम्हाला निराशेच्या गर्त अंधकाराकडे घेऊन जातो. मुळात आपण स्टार आहोत, डोक्यात गेलेली ही भावनाच ह्या सर्वाला कारणीभूत ठरते.

अशाच प्रकारची एक डोकं सुन्न करणारी दुर्दैवी घटना नुकतीच पुण्यात घडली आहे. टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. समीर पुण्यातील वाघोली येथे राहत होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, समीरने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. रविवारी संध्याकाळी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल हा घरी पोहोचला. त्यावेळी समीर पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याने लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली. समीरला खाली उतरवून तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेले. तिथे तपासणी करून त्याला मृत घोषित केले. पोलीस सर्व दिशेने तपास करत आहेत. घटनास्थळी सुसाइट नोट सापडलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून तो त्रस्त होता, असे समजते. प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

‘जण पळ भर म्हणतील, हाय हाय’ ह्या युक्तीला साजिरें असे त्याच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अनेक पोस्ट त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.समीर हा टिकटॉक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओमुळे खूप प्रसिद्ध झाला होता. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता.

पण एका तरुण मुलाचा असा दुर्दैवी अंत बरेच प्रश्न समोर सोडून जातो. खरंच आत्महत्या हा एकमेव पर्याय त्याच्या समोर होता? आत्महत्येचे कारण काहीही असो ( जे असेल ते पोलीस तपासात समोर येईलच ) पण आजचा तरुण खरंच इतका कमजोर आहे की तो एका छोट्याश्या रिजेक्शन ने स्वतःचा जीव संपवतो? मग ते रिजेक्शन प्रेमाचे असेल किंवा इतर काहीही. आलेल्या संकटाला सामोरे जाण्या ऐवजी तो आत्महत्येचा पळपुटा मार्ग स्वीकारतो ? त्याचा जीवनाच्या सुंदर असण्यावर खरंच विश्वास नसतो?

पालक म्हणून आपण आपल्या मुलाला यश मिळवणे शिकवण्या ऐवजी आपण त्यांना अपयश पचवणे शिकवले पाहिजे हे जास्त महत्वाचे नाही का वाटत तुम्हाला? एक पालक म्हणून आपण नाही तर कोण शिकवेल त्यांना की ‘रात्रीच्या गर्भात असे, उद्याचा उषःकाल’!

Leave a Reply