शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना तब्बल ९ तासाच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेऊन आहे. रविवारी मध्यरात्री ११.३० च्या जवळपास संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. १ ऑगस्ट २०२२ रोजी (आज) संजय राऊत यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. त्याअगोदर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. संजय राऊतांच्या कोर्टातमधील सुनावणीकडे सर्वाचे लक्ष आहे. परंतु संजय राऊत यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक केली आहे, त्याची ईडीने चार कारणे सांगितली आहेत.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, असहकार, बेहिशेबी रोकड जप्त आणि संशयास्पद कागदपत्र या तीन कारणांमुळे संजय राऊतांना अटक केली आहे. ईडीचे अप्पर संचालक सत्यव्रत कुमार यांनी ३१ जुलै (काल) संजय राऊत यांच्या अटकेच्या मेमोवर सही केली होती. १ ऑगस्ट (आज) ईडी कोठडीनंतर सत्यव्रत इतर ४ अधिकाऱ्यांसोबत राऊतांची अजून चौकशी करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक प्रश्नांच्या उत्तरात संजय राऊत यांनी मला माहिती नाही. आता मला आठवत नाही अशी दिली आहेत. अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी त्यांनी दिलेल्या उत्तरांवर समाधानी नाहीत. ईडीने ज्या साक्षीदारांचे जबाब घेतले ते व मनी ट्रेलचे पुरावे यांच्याशी राऊतांची उत्तर जुळत नसल्याने त्यांना ईडी कार्यालयात आणून अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संजय राऊतांच्या अटकेनंतर त्यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी पत्रा चाळ कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. अटक करण्यासाठी काहीतरी हाव म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केलं आहे. असे सुनिल राऊत म्हणाले आहेत.