संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ दिसणार नव्या मालिकेत

0
439

छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका रसिकांना चांगलीच भावली आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. या मालिकेत समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे साकरतोय. संकर्षण साकारत असलेली समीरची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते आहे. संकर्षणचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे हा देखील अभिनेता आहे. आता संकर्षणचा भाऊ देखील एका नव्या मालिकेत दिसणार आहे. अधोक्षज कऱ्हाडेने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याहबद्दल माहिती दिली आहे.

अधोक्षज कऱ्हाडेने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याबाबात माहिती दिली आहे. स्टार प्रवाहवरील पिंकीच विजय असो या मालिकेत अधोक्षज बंटीची हटके भूमिका निभावताना दिसणार आहे. येत्या 31 जानेवारी 2022पासून रात्री 11 .00वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. अधोक्षज कऱ्हाडेने इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, जसा पेहराव,भूमिकापण अगदी तशीच!एकदम कलरफुल्ल “बंटी”.नवीन मालिका,नवीन भूमिका,नवं आव्हान!”पिंकीचा विजय असो!

संकर्षण कऱ्हाडे आणि अधोक्षज कऱ्हाडे बालपणापासून नाटकांमध्ये काम करत आहे. अधोक्षज झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर तो झीवरील घेतला वसा टाकू नको या मालिकेत दिसला होता. शांतता! मराठीचं कोर्ट चालू आहे, या लघुपटात देखील तो दिसला आहे. पिंकीच विजय असो या मालिकेत विजय आंदळकर आणि शरयू सोनवणे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. युवराज धोंडेपटील आणि पिंकीची हटके प्रेमकहाणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. युवराज आणि पिंकीच्या या कथेत कलरफुल्ल बंटीची भूमिका नेमकी काय असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Leave a Reply