‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायक लवकरच अडकणार विवाहबंधनात

0
381
‘Saregampa Little Champs’ fame singer will soon get married‘Saregampa Little Champs’ fame singer will soon get married
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायक लवकरच अडकणार विवाहबंधनात

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम रोहित राऊत लवकरच गायिका जुईली जोगळेकरसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. नुकतेच त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. त्यानंतर ते कधी लग्नबंधनात अडकणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

जुईलीने आणि रोहितने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्या दोघांचा एक कँडिड फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना “चला” दहा दिवस बाकी आहेत.. ही पोस्ट शेअर करताना #10daystogo #rohilee हे हॅशटॅग दिले आहेत. यावरून ते दोघे २३ जानेवारीला लग्नबंधनात अडकू शकतात. रोहित व जुईलीच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.रोहित आणि जुईलीने सोशल मीडियावर शेअरे केलेल्या या पोस्टमुळे हे दोघेजण येत्या दहा दिवसांत लग्न करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

२००९ साली झी मराठीवर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा पहिला सीझन आला होता. रोहित राऊत या पहिल्या पवार्चा विजेता ठरला होता. त्यानंतर रोहितने गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक म्हणून आली होती. तेव्हापासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मग प्रेमात. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, जुईली आणि रोहितच्या या फोटोवर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर केला आहे. यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर यांच्यासह अनेक कलाकारांनी कॉमेन्ट केल्या आहेत. तसेच या दोघांच्या चाहत्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Leave a Reply