राजा राणी ची गं जोडी मालिकेचे कथानक आणि दमदार अभिनय यामुळे मालिकेतील कलाकारही रसिकांचे आवडते बनले आहेत. त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रसिकांची इच्छा असते. या मालिकेतील रणजीतचे थोरले बंधू दादासाहेब ढाले पाटील म्हणजेच अभिनेता शैलेश कोरडे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताना दिसतायेत. शैलेश कोरडे यानेदेखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. शैलेश कोरडेने अभिनेत्री श्रुती कुलकर्णीसोबत लग्न गाठ बांधली आहे. श्रुती स्पेशल पोलीस फोर्स या मालिकेत तर शभूराजे, समुद्र या नाटकात देखील काम केलं आहे.अभिनया सोबतच श्रुती कुलकर्णीला नृत्य आणि गायनाची आवड आहे.
इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. शैलेशने लिहिले, लग्नाचा अचानक निर्णय झाल्यामुळे आणि कोविडच्या निर्बंधांमुळे कमी मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. तरी आपणा सर्वांचे आशिर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहेत अशी अपेक्षा करतो. यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शैलेश कोरडेने राजा राणीची गं जोडी या मालिकेअगोदर झी मराठीवरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या मालिकेतून काम केले होते. मालिकेतील मुख्य नायक मदनचा भाऊ पोपटची भूमिका शैलेश कोरडे यांनी साकारली होती.
