अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने स्टार प्रवाह वाहिनीवरील दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. याअगोदर तिने पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम सांभाळले होते. हृता ही मूळची कोकणातली मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईतच. कला क्षेत्रातील आपल्या या सुंदर प्रवासाबद्दल बोलताना हृता भावनिक झाली.
काल १३ मार्च रोजी तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओत ती म्हणते की, आजच्या दिवशी मार्च २०१३ साली ९ वर्षांपूर्वी माझा मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला तो क्षण माझ्यासाठी शाइनिंग मोमेन्ट ठरला.
या प्रवासात अनेक विविधांगी भूमिका साकारत असताना माझा पहिला चित्रपट प्रदर्शित होत आहे, हे सर्व माझ्यासाठी आनंददायी आहे. फुलपाखरू या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली होती.

दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक आणि स्ट्रॉबेरी शेक ही शॉर्टफिल्म तिने अभिनित केली. मात्र आगामी अनन्या या चित्रपटातून हृता प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्या करिअरच्या दृष्टीने खुपच खास ठरणार आहे. रवी जाधव यांच्या अनन्या या चित्रपटातून हृता एक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे तीच्या या सिनेमाची सर्वांना आतुरता लागुन राहिली आहे.