शिखर धवनने इन्स्टाग्राम शेअर केला मुलांच्या भेटीचा भावनिक व्हिडिओ

0
350
Shikhar Dhawan shared an emotional video of the children's meeting on Instagram

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन जवळपास दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या मुलाला भेटू शकला आहे. शिखर धवनने आपल्या मुलाच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shikhar Dhawan indian cricket

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन त्याच्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी त्याचा मुलगा जोरावरला भेटला आहे. व्हिडिओमध्ये धवन आपल्या मुलाला आपल्या मांडीवर बसवतो आणि त्याला मिठी मारतो. धवनचा मुलगा 2020 पासून ऑस्ट्रेलियामध्ये होता. कोविडच्या कडक नियमांमुळे धवन देखील ऑस्ट्रेलियाला जाऊन आपल्या मुलाला भेटू शकला नाही. धवनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “त्याच्यासोबत खेळणे, त्याला मिठी मारणे, बोलणे, हे खूप भावूक करणारे क्षण आहेत. हे असे क्षण आहेत जे कायम आठवणीत राहतील.”

Shikhar Dhawan

गेल्या वर्षी शिखर धवन त्याच्या वैयक्तिक आयुष्यमुळे चर्चेत आला होता. जेव्हा त्यांची पत्नी आयेशा मुखर्जीने नऊ वर्षे जुने नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवनचा पत्नी आयशा मुखर्जीसोबत गेल्या वर्षी घटस्फोट झाला होता. आयशाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती दिली होतीत्याने 2012 मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केले, त्यानंतर 2014 मध्ये आयशाने जोरावरला जन्म दिला. जोरावर हा मेलबर्नमध्ये त्याच्या आईसोबत राहतो.

पुढील महिन्यापासून शिखर आयपीएल लीगमध्ये व्यस्त असेल. त्यामुळे सध्या तो आपल्या मुलांसोबत वेळ घालवत आहे. शिखर धवन भारताचा भरवशाचा फलंदाज आहे. आगामी आयपीएल 2022 मध्ये तो पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. पंजाबने 8.25 कोटी रुपये मोजून त्याला विकत घेतलं आहे. यंदाच्या सीजनमध्ये त्याची पंजाब किंग्सच्या कर्णधारपदीही निवड होऊ शकते.

Leave a Reply