डाएटच्या मदतीने शिल्पा तंदुरुस्त तर राहतेच पण सोबत ती आपली फिगरही मेंटेन ठेवते. अत्यंत व्यस्त जिवनशैलीतही ती व्यायाम, योगा आणि आहार या त्रिसूत्रीकडे कधीही दुर्लक्ष होऊ देत नाही आणि दूर्लक्ष करत ही नाही. तुम्हीही शिल्पा सारखे फिट राहु इच्छिता तर तिने दिलेल्या टीप्स जरुर अमलात आणा.
डाएटिंगविषयी विचारल्यावर शिल्पा सांगतात, “लोकांना न्युट्रिशनची माहिती असणं गरजेचं आहे. 30% वर्कआउट असतो. मग ते जिम असो किंवा योग. मात्र, उत्तम आरोग्यासाठी 70% डाएट गरजेचा असतो.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही केवळ अभिनयच नव्हे तर तिच्या चिरतारुण्य दर्शवणाऱ्या फिगरसाठीही ओळखली जाते. तिच्या बरोबरीच्या अनेक अभिनेत्री आज वयाच्या शिकार झाल्या आहेत. पण, शिल्पा शेट्टीला ना वयाचे बंधन ना तिच्या क्षेत्रामुळे निर्माण होणाऱ्या जीवनशैलीच्या परिणामांचे. वय आणि तिचे क्षेत्र या कशाचाच परिणात तिच्या शरीरावर झालेला पाहायाल मिळत नाही.
अर्थात ती त्यासाठी तितके कष्टही घेते. पण एका मुलखतीदरम्यान शिल्पा शेट्टीने तिच्या आहाराबद्दल सांगितले. तिच्या एकूण फिगरसाठी तिचा आहार अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो. चला तर मग आपण ही जाणूया शिल्पा शेट्टीचा डाएट कसा असतो ते.
शिल्पा शेट्टी प्रत्येक दिवशी 1800 कॅलरी एनर्जी घेते. त्यांच्या दिवसाची सुरुवात आवळा आणि एलोवेरा ज्यूसने होते. यासोबतच ती लो ग्यासेमिक इंडेक्सचे कार्बोहायड्रेट घेते. पदार्थ तयार कराताना ती ऑलिव्ह ऑइलचा वापर करते. शिल्पाला जास्तीत जास्त नॉनव्हेजिटेरिअन पदार्थ खाणे आवडते.
योगा आणि व्यायामानंतर शिल्पाला प्रोटीन शेक घ्यायला आवडते ती आठवड्यातून सहा दिवस खाण्यावर नियंत्रण ठेवते. एक दिवस बाहेर जाऊन ती रेस्तरॉमध्ये जेवते. जेवताना ती स्नॅक्स घेत नाही. कारण तिला वाटते की, यामुळे कॅलरीचे प्रमाण वाढते.
शिल्पाच्या डाएट टीप्स:
नाश्ता: शिल्पा नाश्त्यात दलिया (लापशी), दूध किंवा पोषक तत्व असलेली फळे आदिंचा समावेश शिल्पाच्या नाश्त्यात असतो. ती जर प्रवासात असेल तरीसुद्धा ती हेल्दी नाश्ता खाण्यालाच पसंती देते असेही शिल्पा सांगते.
डाएट: आपल्या आहारात शिल्पा नेहमी फायबरयुक्त पदार्थ असतील याबाबत दक्ष असते. कारण, फायबरयुक्त आहार घेतल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. ऑयली फूड (तेलकट पदार्थ) खाल्याने पोटात क्रेविंग होत नाही. त्यामुळे तुम्ही बराच काळ काहीच खात नाही.
असा आहे शिल्पाचा डायट प्लान:
ब्रेकफास्ट मध्ये : 1 वाटी दलिया आणि एक कप चहा ( ग्रीन टी ) वर्कआउटनंतर : प्रोटीन शेक, 2 खजूर, 8 मनुके
लंचमध्ये : तुप लावलेली भाकरी (वेगवेगळ्या पीठांनी तयार केलेली) चिकन, डाळ, रिफाइंड तेलात बनवलेली भाजी
दुपारनंतर : एक कप ग्रीन टी
संध्याकाळी : मिल्क
रात्री : सफरचंद आणि सलाद
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी शिल्पा नेहमी कमी कॅलरी असलेले अन्नच खाते. लो कॅलरी फूड शरीरात चरबी निर्माण होऊ देत नाहीत. माईंडफुल इटिंग करण्यासही शिल्पा प्राधान्य देते. माईंडफूल इटिंग ही एक पद्धत आहे. जी आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होते.