शिंदे – ठाकरे यांच्या सामंजस्य होऊ नये यासाठी; ‘या’ आमदारचे शिवसैनिकांना पत्र

0
373
Shinde - Thackeray should not be reconciled; 'Ya' MLA's letter to Shiv Sainiks

शिवसेनेमधील ४० आमदारांनी बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीसरकार कोसल. या सगळ्या राजकीय उलटापालटीमध्ये शिवसेना व बंडखोर आमदारांमध्ये जबरदस्त शब्दामध्ये वादावादी होताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये बंडखोरी केलेल्या आमदारांच्या पदाधिकाऱ्यांची पदे काढून घेण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान अनेक आमदार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व भाजपाशी जुळवून घ्यावे असे सल्ले देत आहेत. तसच बंडखोर आमदार उदय सामंत यांनी शिवसैनिकांना पत्र लिहून आवाहन केले आहे. त्यानी दिलेल्या पत्रामध्ये केवळ बाळासाहेब ठाकरे व वाघाचा फोटो आहे. परंतु उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने पुन्हा एकदा चर्चा उधाण आलं आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये जुळू नये म्हणून कोण कारस्थान करत आहे का? याचा जाहीर खुलासा उदय सामंत यांनी पत्रामधून केला आहे.

uddhav thackeray

सामंत यांनी लिहलेले पत्र…

सस्नेह जय महाराष्ट्र… पत्र प्रपंच एवढ्यासाठीच, काल आपल्या रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात रत्नागिरीचे कमी आणि लांजा, राजापूर व संगमेश्वरचे शिवसैनिक अधिक होते असो. मेळाव्याची सुरुवात विभाग प्रमुखांच्या भाषणांनी झाली. त्यांनी शिवसेनेप्रति निष्ठा व्यक्त केली. त्यानंतर नेत्यांची भाषणे सुरू झाली काहीनी मला टोमणे देखील मारले. परंतु ती काही मंडळी कोण होती? ज्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या पहिल्या व दुसऱ्या निवडणुकीला नारायण राणे यांच्या आदेशाचे पालन केले. काहींनी प्रचाराची पत्रकेदेखील गटारामध्ये फेकून दिली होती. त्यामधील एकाने विनायक राऊत माझ्या अन्नावर जगतात नाहीतर त्यांना जेवण पण मिळू शकत नाही असे जाहीर वर्तमान पत्रातून दिले होते.

Eknath Shinde

पुढे ते म्हणाले… माझा कोणावरच राग नाही परंतु दु:ख एकच आहे की, विनायक राऊत यांना आपलं मानलं, राजकारणाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह जपले अशा व्यक्तीने मला गद्दार, उपरा अजून बरेच काही म्हणाले मला आवडले नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सामील झालो तो फक्त एक शिवसैनिक म्हणूनच ज्या व्यक्तीने बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवण्याचा विचार केला. ज्यांनी बाळासाहेबांची टी बाळू म्हणून टिंगल केली. त्या व्यक्तीच्या विरोधात हा उठाव होता. हा उठाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असता सुध्दा शिवसेनेला राज्यामध्ये चौथ्या क्रमांकावर जावं लागतं त्यासाठी होता. विनायक दामोदर सावरकर यांना विरोध करणाऱ्यां विरूध हा उठाव होता. जी लोकं उद्धव ठाकरेंच्या स्वभावाचा फायदा घेत शिवसेना संपवू पाहणाऱ्या विरोधात हा उठाव होता. माझ्या राजकीय कारकिर्दीचा विचार न करता याला गद्दारी म्हणायची की साहस हे देखील आपणच ठरवा. लवकरच भेटू असं देखील उदय सामंत म्हणाले आहेत.

Leave a Reply