जेवणाची थाळी संपवून दाखवा आणि नवी कोरी बुलेट घेऊन जा तीही अगदी फ्री…!

0
831
Bullet thali in Vadgaon Maval Hotel Shivraj

भारतीय लोक नेहमीच खाण्याचे शौकीन म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. हॉटेल व्यावसायिक लोक देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्याकरता नवनवीन उपक्रम राबवत असतात. ज्यामुळे ग्राहकांची गर्दी आपल्या रेस्टॉरंटमध्ये यावी असा उद्देश असतो.

पुण्यातील एक रेस्टॉरंट सध्या खूपच चर्चेचा विषय बनली आहे या रेस्टॉरंटमध्ये चक्क “संपूर्ण थाळी खाऊन संपवून दाखवा व रॉयल एनफिल्ड बुलेट गाडी घरी घेऊन जा ती ही फुकट!” अशी स्कीम लावली आहे! या हॉटेल व्यावसायिकाने हॉटेलच्या बाहेर चक्क नव्याकोऱ्या पाच रॉयल एनफिल्ड बुलेट उभ्या केल्या आहेत.

वडगाव मावळ, पुणे येथील ‘शिवराज’ हॉटेल चे मालक ‘अतुल वायकर’ यांनी हा नवीन फंडा शोधून काढला आहे लॉकडाउनच्या काळानंतर अनेक हॉटेल व्यावसायिकांचे धंदे डबघाईला आलेले आहेत. अशामध्ये आपल्या हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी वाढवण्याकरता हॉटेल व्यावसायिक नवनवीन योजना व उपक्रम सुरू करत असतात.

4 Kg Bullet Thali Win Bullet Vadgaon Maval Pune

‘अतुल वायकर’ यांच्या शिवराज हॉटेलमध्ये सहा प्रकारच्या मोठ्या थाळ्या वाढल्या जातात. ज्यामध्ये स्पेशल रावण थाळी, बुलेट थाळी, मालवणी मासे थाळी, पैलवान मटण थाळी, बकासुर चिकन थाळी आणि सरकार मटण थाळी अशा प्रकारच्या थाळ्या ग्राहकांना वाढल्या जातात.

सध्या ज्या नॉनव्हेवज थाळीची चर्चा संपूर्ण भारतभर होत आहे ती म्हणजे ‘बुलेट थाळी’ होय. या थाळीचे वैशिष्ट्य असे आहे की, या थाळीमध्ये एका वेळी चार किलो मटन, तळलेले मासे, बारा प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ वाढले जातात.

यामध्ये आठ पीस पापलेट, सुरमई आठ पीस, चिकन लेग पिस, कोळंबी करी, एक मटन मसाला,  कोळंबी बिर्याणी,  आठ भाकरी, आठ पोळ्या,  एक सुकट, कोळंबी कोळीवाडा,  पाण्याच्या चार बॉटल्स, आठ सोलकडी, आठ रायता, पापड आणि आठ मटन सूप वाढले जातात.

4,444 रुपये किंमतीची ही बुलेट थाळी पहिल्याच प्रयत्नात दोन लोकांना एका तासात संपवावी लागते.  ही या बुलेट थाळीच्या स्पर्धेची मुख्य अट आहे.
तर दोन हजार पाचशे रुपयाची छोटी बुलेट थाळी यामध्ये एकाच व्यक्तीला ही थाळी एक तासाच्या आत संपवावी लागते. वेळेत जर ही थाळी संपवली तर जिंकणाऱ्या व्यक्तीला एक रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल अगदी फ्री मिळेल असे या स्पर्धेचे बक्षिस आहे!

Bullet thali Win royal Infiled hotel

आतापर्यंत केवळ महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचे ‘सोमनाथ पवार’ यांनीच ही ‘बुलेट थाळीची’ स्पर्धा जिंकली असून त्यांना ‘शिवराज’ हॉटेलचे मालक ‘अतुल वायकर’ यांनी ठरल्याप्रमाणे बक्षिस म्हणुन अगदी मोफत एक रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल देण्यात आली आहे!

‘शिवराज’ हॉटेलच्या या बुलेट थाळी स्पर्धेमध्ये आजपर्यंत अनेक लोकांनी भाग घेतला असून, हॉटेलच्या बाहेर बुलेट थाळी स्पर्धेची पाटी लावल्यामुळे व बाहेर उभ्या केलेल्या पाच नव्या कोऱ्या-करकरीत रॉयल एनफिल्ड बुलेट पाहून या हॉटेलच्या मध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी वाढली असून रोज अनेक हौशी लोक या ‘बुलेट थाळी खा व रॉयल एनफिल्ड घरी घेऊन जा’ या स्पर्धेत भाग घेण्याकरिता येत आहेत.

Leave a Reply