बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या अक्टिंग आणि उत्तम मराठी बोलण्याच्या कमालीतून ओळखली जाते. ती बऱ्याचदा यामुळे चर्चेत असते. मध्यंतरी ती आणि तिचा प्रियकर छायाचित्रकार रोहन श्रेष्ठा यांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू होत्या. मात्र नुकतेच असे समजले जात आहे, की त्यांच्या या नात्यात दुरावा आला आहे. लग्नाची चर्चा सुरू असताना दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्यामुळे कपूर कुटुंबाला आणि श्रद्धाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

त्यांच्या ब्रेकअपनंतर आता दोघांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. ब्रेकअपनंतर दोघांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे.
ब्रेकअपच्या चर्चा रंगल्यानंतर श्रद्धाकपूरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, अजून ऐकवा….’ असं लिहिलय. तर एका वेब पोर्टलने रोहनला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रोहन म्हणाला, ‘मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल काही बोलायचं नाही…’ असं समोर आलं आहे.
श्रद्धानं भलेही तिचं आणि रोहनचं नातं जाहिरपणे स्वीकारलं नसलं, तरी त्या दोघांत खास मैत्री आहे. हे दोघंही एकमेकांना महाविद्यालयीन दिवसांपासून ओळखत आहेत. इतकंच काय, तर आता त्यांनी लग्नाचा निर्णयही घेतल्याचं कळलं. पण, आता मात्र त्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार जानेवारी महिन्यापासूनचं त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
श्रद्धाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी रोहन गोव्यातही अनुपस्थित होता. म्हणून दोघांचं ब्रेकअप झालं आसल्याचं सांगण्यात येत आहे. पण हेच त्यांच्या विभक्त होण्यामागे खरं कारण आहे का? मात्र अद्याप कोणतीच बाब समोर आली नाही आहे.