श्वेता झाली भावुक… जीजीच्या साडीचा सांगितला किस्सा

0
375
Shweta became passionate ... told the story of GG's sari
Shweta became passionate ... told the story of GG's sari

झी मराठीवरील लागीरं झालं जी हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे या मालिकेतील जिजी चे पात्र विशेष सगळ्यांचे आवडते होते . जिजीची भूमिका साकारणाऱ्या कमल ठोके यांचे १४ नोव्हेंबर २०२० रोजी दुःखद निधन झाले होते. कमल ठोके या कॅन्सरने त्रस्त होत्या. त्यांच्यावर बंगलोर येथील रुग्णालयात उपचार चालू असतानाच त्यांच्या निधनाची बातमी धडकली. लागीरं झालं जी या मालिकेच्या सर्व पात्रासाठी हा धक्का होता. त्यांच्या आठवणीत आजही मालिकेतील सहकलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही पोस्ट करतात. यावेळेस मालिकेची निर्माती म्हणजेच श्वेता शिंदे हिने एक स्टोरी शेअर करून जिजींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जिजी म्हणजेच कमल ठोके यांनी श्वेता शिंदेला एक साडी भेट म्हणून दिली होती. मी दिलेली साडी एकदा तरी नेसशील ना? तुला या साडीत मला पहाचंय असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर श्वेताने ती साडी नेसली आणि त्याचा फोटो शेअर केला. श्वेता म्हणते की, आजची ही साडी माझ्यासाठी खास आहे. त्यामागे कारणही तसच आहे. लागिरं झालं जी मधील आपल्या सर्वांच्या लाडक्या जीजींनी ही साडी मला गिफ्ट केली होती. ही साडी देताना त्या मला म्हणाल्या होत्या. “एकदा तरी नेसशील ना ही साडी?” मला ह्या साडीत पाहण्याची त्यांची खूप इच्छा होती. खरतर ही साडी नेसून, छान तयार होऊन मला त्यांच्यबरोबरच फोटो काढायचे होते.पण तो योग कधी आलाच नाही, त्यापूर्वीच जीजी आपल्याला सोडून गेल्या. पण त्यांनी दिलेली ही साडी आजही मला त्यांच्या मायेची ऊब देते. ही साडी जेव्हा मी नेसले तेव्हा सतत त्या माझ्या आजूबाजूला असल्याचा भास मला जाणवत होता. त्यांच्याकडे पाहिलं की नेहमी त्यांच्या डोळ्यात मला माझ कौतुकच दिसायचं. मी साताऱ्याची आणि त्या कऱ्हाडच्या असल्यामुळे त्यांना नेहमी माझ्याबद्दल एक वेगळाच अभिमान असायचा आणि दरवेळी त्या हे बोलूनही दाखवत. ही साडी म्हणजे जीजींनी मला दिलेला आशीर्वाद आणि त्यांच्या माझ्यावरील अमाप प्रेमाची आठवण समजते. आणि ती मी नक्कीच आयुष्यभर स्वतःकडे जपून ठेवणार आहे. “जीजी, आज तुम्ही इथे माझ्याबरोबर नाही आहात. पण मी नक्कीच सांगू शकते की, तुम्ही जिथे कुठे असेल तिथुन मला पाहत असाल.आणि या साडीत मला पाहून तुम्हालाही खूप आनंद होत असेल.” मिस यु जीजी. अशी भावनिक पोस्ट तिनी केली आहे.

Shweta Shinde
Shweta Shinde

Leave a Reply