Siddharth Chandekar & Mitali Mayekar Haldi Photos | हळदी समारंभातील काही खास क्षण…!

0
990
Siddharth Chandekar Actor Mitali Mayekar Actress Haldi Marriage Photos

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बहुचर्चित जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर फायनली येत्या 24 जानेवारीला लग्नबंधनांत अडकणार आहेत. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर एकमेकांसोबत दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. या दोघांनी यापूर्वी ओपनली आपल्या नात्याबद्दल मीडियाला सांगितले आहे. जानेवारी 2019 मध्ये या दोघांनी ऑफिशियलली साखरपुडा करून आपण लग्न करणार आहोत असे जाहीर केले होते!

जून 2020 मध्ये हे लग्न आयोजित केले होते. मात्र कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन लागल्याने हा विवाह पुढे ढकलण्यात आला. कारण दोघांनाही त्यांचा विवाह सोहळा थाटामाटात व आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार पाडायची ईच्छा होती. दरम्यान 2020 च्या दिवाळीमध्ये सिद्धार्थाने आणि मिताली यांचा एक रोमँटिक फोटो मितालीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करत मितालीने “मिस्टर अँड मिसेस नेक्स्ट इयर” असे कॅप्शन टाकले होते!

Siddharth Chandekar Mitali Mayekar Haldi Lagn Photos

२२ जानेवारी रोजी या दोघांचा हळदीसमारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला! या कार्यक्रमाच्यावेळी सिद्धार्थ ने पिवळ्या रंगाची शेरवानी तर मितालीने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या सोहळ्यात दोघांचा स्वॅग लुक पाहायला मिळाला. सिद्धार्थ आणि मिताली यांच्या हळदी समारंभाचा व्हिडीओ वायरल झाला असून यामध्ये ही जोडी खूपच एन्जॉय करताना दिसत आहे!

हळदी समारंभात मिताली आपल्या ग्गॉगल लावून ठुमके घेताना दिसत आहे, तर सिद्धार्थ देखील मितालीवर आपल्या प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. हळदी समारंभामध्ये सिद्धार्थने मितालीला स्वतःच्या हाताने हळद लावली व लाडिकपणे होणार्‍या बायकोच्या गालाची गोड पापी देखील घेतली. सिद्धार्थ आणि  मितालीच्या हळदी समारंभ मध्ये त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि नातलगांनी डान्स मस्ती केली आहे.

आज होणाऱ्या संगीत समारंभामध्ये डान्स कोरिओग्राफर ओमकार शिंदे यांनी काही गाण्यांवर कोरीअोग्राफी करुन  डान्स बसवून घेतले आहेत. मिताली आणि सिद्धार्थ आता कोणत्या गाण्यावर डान्स परफॉर्मन्स करणार आहे? हे पाहणे त्यांच्या चाहत्यांकरता अौत्सुक्याचा विषय राहणार आहे.

क्लासमेट, पिंडदान यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांना हॉरर टेलीविजन शो,’तू आहेस का?’ य‍ामध्ये पाहायला मिळणार आहे. मिताली मयेकर झी मराठीच्या सीरियल ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत लीड रोल मध्ये कस्तूरीं नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. ज्यात ती एका नर्सच्या भूमिकेत काम करत आहे. मिताली च्या या भूमिकेमुळे तिचे निरागस लुक्स आणि शांत स्वभावी कस्तूरीची भूमिका आणि कॅरेक्टर घराघरात पोहचले आहे.

सिद्धार्थ आणि मितालीचे बहुचर्चीत लग्न थाटामाटात 24 तारखेला दिमाखदारसोहळ्यामध्ये पुण्यात आयोजित केले आहे. ही लोकप्रिय जोडी आता साता जन्माच्या गाठींनी विवाहबद्ध होणार आहेत.
सिद्धार्थ आणि मिताली या दोघांनाही विवाह करता खूप शुभेच्छा! नांदा सौख्य भरे!!

Siddharth Chandekar & Mitali Mayekar Haldi Photos

Leave a Reply