सिद्धार्थच्या पत्नीनं सोशल मीडियावरुन जाधव आडनाव हटवलं.. सिद्धार्थ आणि तृप्ती यांचा होणार का?

0
356
Siddharth Jadhav wife deleted last name Jadhav from social media .. Will it happen to Siddharth and Trupti viral news in marathi

मराठी चित्रपटामधील सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ही चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. परंतु काही दिवसांपूर्वी मटा ऑनलाइनला दिलेल्या प्रतिक्रियेत सिद्धार्थने या सर्व गोष्टींचा स्पष्टपणे शब्दांमधून नकार दिला होता. तसेच या फक्त अफवा असल्याचं त्याने सांगितलं होतं. सिद्धार्थची पत्नी तृप्तीनं तिच्या सोशल मीडियावरील नावामध्ये बदल करून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे. तृप्तीनं नावामधले जाधव हे अडनाव हटवले आहे. त्यामुळे सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाद्दल सध्या चर्चा सुरु आहे. सिद्धार्थ हा तृप्ती व त्याच्या दोन मुलींसोबत काही दिवसांपूर्वी दुबईला ट्रीपला गेला होता. त्यावेळी सिद्धार्थने मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

२००७ मध्ये सिद्धार्थ आणि तृप्ती ह्या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्या दोघांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. झलक दिखला जा या शोमध्ये सिद्धार्थ आणि तृप्तीनं सहभागी झाले होता. या शोमध्ये तृप्ती आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. ई-टाईम्सच्या वृत्तानुसार, गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ व तृप्ती हे एकत्र राहात नाहीत. परंतु सिद्धार्थ आणि तृप्तीनं त्यांच्या नात्याबद्दल अजून कोणतीच माहिती दिलेली नाही.

सिद्धार्थनं अनेक मराठी व हिंदी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या नृत्यशैलीनं आणि हटके स्टाईलनं सिद्धार्थ प्रेक्षकांची मनं जिंकतो आहे. पुरस्कार सोहळ्यांचे होस्टिंग देखील सिद्धार्थ करतो. बॉलिवूड चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहसोबत सिद्धार्थन सिम्बा या चित्रपटामध्ये काम केलं. तसेच सिद्धार्थनं डान्स महाराष्ट्र डान्स सिझन-१ या शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारली. धुराळा, दे-धक्का आणि टाईमपास या चित्रपटांमधून सिद्धार्थला प्रेक्षकांचे प्रेम आणि पसंती मिळाले आहे. सिद्धार्थचा दे-धक्का-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थसह शिवाजी साटम आणि मकरंद अनासपुरे हे अभिनेते देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

 

Leave a Reply