छोट्या पडद्यावरील कलाकार. ‘हा’ अभिनेता मोठ्या पडद्यावर घेऊन येतोय ‘दिशाभूल’

0
374
Small screen actors. Ha actor brings misdirection on big screen

‘दिशाभूल’ चित्रपटात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीचा. मुख्य भूमिका बजावणारे हे असणार अभिनेते.

मराठी सिनेमा ‘दिशाभूल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिका पटकवणारे अभिनेते यांनी छोट्या पडद्यावर आपली जादू तर दाखवलीच पण आता मात्र हेच अभिनेते मुख्य अभिनेते मोठ्या पडद्यावर आपला अभिनय उत्तमरित्या मांडण्याकरिता सज्ज आहेत.

tejas barve

‘मी मिरवणार अन् समद्यांची जिरवणार’ अशी सुमी म्हणजे अमृता धोंगडे आणि पायलट तेजस बर्वे या सिनेमात असतील. तसेच देवमाणूस’ फेम माधुरी पवार सुद्धा दिसणार देखील प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मात्र मराठी सिनेसृष्टीतील अपकमिंग चॉकलेट बॉय अभिनय बेर्डे देखील या सिनेमातील मुख्य भूमिकेत दिसेल. या सिनेमाचे दिग्दर्शन कैलास जैन करणार आहे.

दिशाभूल’ हा आजच्या तरुणाईचा चित्रपट आहे. कॉलेजमधील मुलांची ही अनोखी कथा असून यामध्ये मैत्री, रोमान्स आणि सस्पेन्स थ्रीलर यांचा मिश्रण असलेला परिपूर्ण असा उत्तम सिनेमा असणार आहे. तरुण पीढीला आकर्षित करणारा हा सिनेमा तरूणाईला नक्कीच आवडेल.

सिनेमासंदर्भात बोलताना अभिनेता अभिनय बेर्डे म्हणाला,”दिशाभूल’ ही एकप्रकारे आगळी वेगळी कथा आहे.यातील माझी व्यक्तीरेखा ही मी आज पर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप पटीने वेगळी आहे. चित्रपटाचे शुटींग आम्ही सध्या गोव्यात करत आहोत. कॉलेज विश्वातील मुलांभोवती फिरणाऱ्या ‘ दिशाभूल’ मध्ये नेमकं काय आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडे दिवस अजून वाट पाहावी लागेल.

Leave a Reply