दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा नुकताच ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा बॉलीवुड मध्ये प्रदर्शित झाला. बऱ्याच कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे त्यातच बॉलीवूड ड्रामा क्वीन कंगना रनौत हिने देखील हा सिनेमा पाहिल्यानंतर बॉलीवूडवर टिका केली आहे.
नुकतेच या चित्रपटाचे कौतुक करत असताना कंगना रनौत हिने आपल्या सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट केली असून त्यात तिने असे लिहिले आहे की, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘अनुपम खेर आणि मिथुन चक्रवती’ स्टार हा सिनेमा आहेत. शिवाय यातील कलाकारांचे काम देखील उत्तम आहे. मात्र तिने हा सिनेमा पाहिल्यानंतर थेटर मधून बाहेर येताच तिने बॉलीवूडवर निशाणा साधत आपली बाजू मांडली सोबतच या चित्रपटाचे भरभरून अभिनंदन केले.
कंगना रनौत थिएटरमधून बाहेर पडताना ज्या पद्धतीने तिचा मुद्दा सर्वांसमोर मांडला त्यामध्ये तिने त्या चित्रपटाचे कौतुक तर केलेच पण कंगनाने असेही म्हटले आहे की चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन, बॉलीवूडने केलेले पाप आज या सर्व या लोकांनी मिळून धुऊन टाकले, इतका चांगला चित्रपट बनवला आहे की हा चित्रपट प्रशंसनीय आहे. मुळात अशा चित्रपटाचे प्रमोशन व्हायला हवेत. माझे असे म्हणणे आहे की जे, उंदरासारखे दडले आहेत त्यांनी बाहेर येऊन या चित्रपटाचा प्रचार करावा चित्रपटांना प्रोत्साहन देऊन त्यात काहीच तथ्य नाही त्यापेक्षा याउलट असे करा की उत्कृष्ट किंवा उच्च दर्जाच्या चित्रपटांना प्रोत्साहन द्या.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात काश्मीरचे सत्य दाखवले आहे ज्यातून अनेक लोकांचे मन अगदी हेलावून टाकले आहे 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून हाकलून देण्यात आले असे एकंदरीत या चित्रपटात दर्शवण्यात आले आहे.
