सोनाक्षीचा मिस्ट्री मॅन? सलमान खाननेच आणली भेट घडवून

0
394
Sonakshi's Mystery Man Salman Khan brought the gift

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची मोठी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षीची एंगेजमेंट झाली आहे. डायमंड रिंग फ्लॉंट करताना तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रिंग फ्लॉंट करताना, सोनाक्षीने तिच्या मंगेतरचे नाव सीक्रेट असे ठेवले आहे. सोनाक्षीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव किंवा चेहरा दिसू दिला नाही, मात्र आता मीडिया रिपोर्ट्सवर नुसार सोनाक्षीचा हा मिस्ट्री मॅन दुसरा कोणी नसून झहीर इक्बाल आहे असे बोलले जात आहे.

Sonakshi Sinha Zaheer Iqbal
सोनाक्षी सिन्हासोबत झहीर इक्बालचे नाव यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले आहे. त्यांच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून व्हायरल होत आहेत. दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.झहीर इक्बालबद्दल बोलायचे तर त्याने नोटबुक, डबल एक्सएल, कमाल खान: बुमरो या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाने आपली छाप सोडली.

झहीर इक्बालच्या वडिलांचे नाव इक्बाल रत्नासी असून ते सलमान खानचे बालपणीचे मित्र आहेत.झहीरने सलमानसोबतचे त्याचे बालपण आणि तारुण्याचे दोन्ही फोटो शेअर केले आहेत. अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त झहीरने 2014 मध्ये सोहेल खानच्या जय हो या चित्रपटात सहाय्यक म्हणून काम केले होते.

Sonakshi Sinha Zaheer Iqbal boyfriend

झहीर आणि सोनाक्षीच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर, दोघांची भेट सलमान खानने घडवून आणली होती. काही काळापूर्वी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत झहीरने सोनाक्षीसोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते- ‘मी हे बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहे. आता मला त्याची पर्वा नाही, असेही सांगितले होते.

Leave a Reply