सोनम कपूरने दिली ही ‘गूड न्यूज’ लवकरच येणार नवा पाहुणा

0
310
Sonam Kapoor's 'Good News' will soon have a new guest

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही खरोखरच अनिल कपूरची म्हणजेच पापा की परी आहे असे बोलायला हरकत नाही. सोनम कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र सोनम लवकरच आई होणार आहे, अशी पोस्ट तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ही पोस्ट म्हणजे एक गूड न्यूज आहे. तिने दिलेल्या गूड न्यूजनंतर बॉलिवूड सेलिब्रिटीजने तिला शुभेच्छा देत कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. सोनमने पती आनंद अहूजासोबत प्रेग्नेंसी फोटोशूट केले. फोटोमध्ये सोनम काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आनंदच्या मांडीवर डोक ठेवून असल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये सोनमचा बेबी बंपही दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत सोनमने एक कवीता शेअर केली आहे. शेवटी तुझ्या येण्याची आता प्रतिक्षा करू शकत नाही असं सोनमने आपल्या कॅप्शन मध्ये म्हंटले आहे.म्सोनम आणि आनंदचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

सोनम आणि आनंदचे लग्न २०१८ मध्ये झाले. सोनम सध्या पतीसोबत लंडनमध्ये राहते.

sonam Anil Kapoor

Leave a Reply