सोनू सूद देवासारखा धावला, रस्त्यावर अपघाती व्यक्तीला स्वत उचलून नेले रुग्णालयात !

0
300
Sonu Sood picked up the accident victim on the road and ran like a god, picked up the accident victim on the road and took him to the hospital

हा अपघाती व्हिडिओ पंजाबच्या मोगा जिल्ह्यात झाला असून सोनूने लगेच त्या व्यक्तीची तात्काळ मदत केली असून सोनूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा स्वतः एक देवदूतच आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याने सर्वसामान्य लोकांची मदत केली आहे. कोरोना काळात तो असा काही लोकांसाठी धावून आला जणू काही देवच. चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदला आता लोकं रिअल लाइफ हीरो असं म्हणतात. नुकताच सोनू सूदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो एका अपघाती व्यक्तीला मदत करताना दिसत आहे.Sonu Sood

पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील कोटकपूरा बायपास रस्त्याजवळ एक अपघात झाला. दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी झाला. हे सोनू सूदला दिसले. त्याने आपण कोण आहोत याचा जरा सुद्धा विचार केला नाही. आणि लगेच त्याने स्वत: च्या हाताने उचलून त्या अपघाती व्यक्तीला रुग्णालयात नेले. सोनूमुळे आता ती व्यक्ती सुखरुप आहे. या व्हिडीओत सोनूसोबत काही लोक दिसत आहेत. पण सोनूने त्यांच्याआधी त्या व्यक्तीला गाडीतून काढले आणि स्वत: च्या गाडी बसवून रुग्णालयात घेऊन गेल्याचे दिसत आहे.

सोनूच्या या कामाचीच नाही तर नेटकरी त्याचा सर्व कामाची स्तुती करत असतात. तो लोकांना कोणत्याच विचार न करता धावून जातो. सोनू हा बॉलिवूडमधला असा अभिनेता असून ज्याच्याकडे सर्वसामान्य जनता समस्या सांगू शकते असा हिरो आहे.

Leave a Reply