लवकरच मराठी सृष्टीतील फेमस अभिनेते निळू फुले यांच्यावर येणार बायोपिक

0
447
Soon, a biopic on famous Marathi actor Nilu Phule will be released

मराठी सिने सृष्टीतील फेमस अभिनेते निळू फुले यांच्यावर लवकरच बायोपिक येणार असल्याचं म्हंटलं जात आहे. मराठी सिने सृष्टी आजकाल जे जे चित्रपट सादर करीत त्यावरून मराठी चित्रपट सृष्टी अधिक पुढे जात आहे असे दिसत आहे. आतापर्यंत आपण पाहत आलोय कि अनेक खेळाडू आणि स्वातंत्र्य सैनिकांवर बायोपिक आले आहेत. एवढच काय तर अजूनही काही येत्या काही वर्षात किंवा महिन्यात येतील असं म्हंटलं जात आहे.

नुकतंच मराठी सृष्टीतील फेमस अभिनेते निळू फुले यांच्यावर बायोपिक येणार आहे असं त्यांच्या मुलीनं म्हंटल आहे. २५० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे निळू फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी एकंदरीत कल्पना त्यांच्या मुलीनं दिली आहे. निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले थत्तेने याबाबत खुलासा केला आहे.

Nilu Phule

गार्गी फुले थत्तेने नुकतंच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत देताना म्हंटलं , लवकरच माझे वडील निळू फुले यांच्यावर बायोपिक येणार आहे. मात्र ‘चित्रपटाची स्क्रीप्ट अद्यापही तयार नाही आहे. मी एका उत्तम लेखकाच्या शोधात आहे जो वडिल्यांच्या बायोपिक वर काम करेल. चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या प्रसाद ओकने प्राथमिक माहिती गोळा केली आहे. त्याने माझ्या वडिलांसोबत बराच वेळ घालवला आहे आणि त्यांच्यावर चित्रपट करण्यासाठी तो फार उत्सुक आहे. माझ्या वडिलांची भूमिका पडद्यावर साकारणाऱ्या अभिनेत्याला फायनल करणे हे खूप आव्हानात्मक काम असेल. या वर्षाच्या शेवटी अखेरीस खरे काय उघड होईल.

निळू फुले यांच्यावर येणाऱ्या बायोपिक साठी मी स्वतः खूप जास्त उत्सुक आहे. शिवाय माझ्या सोबत प्रेक्षकही नक्कीच उत्सुक असतील अशी मी आशा दर्शवते .

NiluPhule

Leave a Reply