लवकरच ‘ हे’ ऐतिहासिक शिवकालीन सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
357
Soon 'He' historical Shiva movies will come to the audience

नुकताच प्रदर्शित ‘पावनखिंड’ हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातल आहे. सर्वत्र राज्यभरात या चित्रपटाचे कौतुक होत आहे. बऱ्याच बॉलिवूड सिनेमांना मागे टाकत हा सिनेमा सिनेसृष्टीत चांगलाच गाजला आहे. ऐतिहासिक सिनेमांवर मराठी प्रेक्षकांचे विशेष प्रेम आहे. पावनखिंड सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे ऐतिहासिक सिनेमांवर आणि मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेले प्रेम , व शिवरायांसाठी मावळ्यांमध्ये असलेली तत्परता व माया हे बहुधा अशा चित्रपटात दाखवले जाते.

येत्या काही वर्षात किंवा महिन्यात शिवराज अष्टक ही फिल्म सीरिज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर आधारित असलेली आठ मालिकांची सीरिज आहे. यातले ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ हे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. लवकरच ‘शेर शिवराज’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Sher Shivraj

शेर शिवराज लवकरच दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांचा ‘शेर शिवराज’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. नवीन चंद्रा, नितीन केणी, प्रद्योत पेंढरकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर या सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमाचे एक पोस्टर रिलीज झाले आहे. पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला हात दिसतो आहे. सिनेमात कोणते कलाकार असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय.

sarsenapati hambirrao movie

सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रविण तरडे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून त्यांनीच या सिनेमाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. हे सूत्रांकडून समजण्यात आले होते.

sarsenapati hambirrao movie

शिवरायांच्या मालिकेतील एक ‘सतराशे एक पन्हाळा’ हा ऐतिहासिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली असून या सिनेमात अभिनेता सुशांत शेलार मुख्य भूमिकेत आहे. ‘सतराशे एक पन्हाळा’ या सिनेमाची निर्मिती स्वप्नील गोगावले करत आहे.

Leave a Reply