साऊथचा सुपरस्टार महेश बाबू जवळच्या व्यक्तीच्या निधनाने दुखी – कोण आहे हि व्यक्ती जाणून घ्या..

0
346
साऊथचा सुपरस्टार महेश बाबू जवळच्या व्यक्तीच्या निधनाने दुखी - कोण आहे हि व्यक्ती जाणून घ्या..

देशासह राज्यातही कोरोना महामारीमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार देखील आपल्याला सोडून गेले. आता दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबू यांचे मोठे भाऊ रमेश बाबू यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले आहे. दक्षिणेमध्ये महेश बाबू यांनी आजवर अनेक चित्रपटात काम केलेले आहे. त्यांनी काम केलेले सगळे चित्रपट प्रचंड गाजले आहेत.

रमेश बाबू यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. काही तासांपूर्वी त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना तातडीने गचीबोवली येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रमेश बाबू यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे.

ramesh babu
साऊथ चित्रपटातील प्रसिद्ध स्टार अभिनेता महेश बाबू कोरोनाच्या विळख्यात आला आहे.  रमेश बाबू यांच्या  निधन झालेची चाहत्यांना माहिती मिळाल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीसह बॉलिवूडमधून देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. रमेश बाबू यांच्या निधनानंतर अनेकांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे.

रमेश बाबू यांच्या निधनाच्या वृत्ताला दिग्दर्शक रमेश वर्मा यांनीही दुजोरा दिला आहे. रमेश वर्मा यांनी ट्वीट केले की, “ऐकून धक्का बसला, रमेश बाबू गरू राहिले नाहीत. कृष्णा गरू, महेश बाबू गरू आणि संपूर्ण कुटुंबाला शोक. ओम शांती.”त्यांनी १९७४ मध्ये ‘अल्लुरी सीतारामराजू’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटानंतर रमेश बाबूने ‘ना इले ना स्वर्गम’, ‘अण्णा चेलेलू’, ‘चिन्नी कृष्णदू’ यासारख्या हिट चित्रपटांसह अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले.

Leave a Reply