बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात रणबीरसोबत बॉलिवूड अभिनेता आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आलियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ब्रह्मास्त्र चित्रपटातील आलियाचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर झाला असून दोघही चर्चेत आले आहे.

या दरम्यान आता रणबीर कपूरच्या आणखी एका आगामी ‘एनिमल’ ( Animal ) चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटात सध्या रणबीरसोबत टॅालिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाची बॅालिवूडमध्ये एन्ट्री होणार असल्याचे वृत्त समोर आले
‘एनिमल’ या चित्रपटात रणबीरसोबत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा दिसणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ‘एनिमल’ चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर सध्या रणबीरसोबत या चित्रपटात ‘पुष्पा’ फेम आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिची एन्ट्री होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. रश्मिका मंदान्ना ‘पुष्पा’ या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनसोबत दिसली होती. यातील तिचा अभिनय आणि ‘श्रीवल्ली’ गाणे खूप चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. सध्या पुष्पा चित्रपटाच्या पुढच्या भागात ही रश्मिका दिसणार आहे. या चित्रपटानंतर तीचा चाहतावर्ग जरा जास्तच वाढला आहे.