अशी ही बनवाबनवी फेम सिद्धार्थ रे चा मुलाची कला क्षोत्रात एंट्री

0
455
Such is the entry of Banwabanvi fame Siddharth Rays son in the field of art

सिद्धार्थ रे ने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता अशी ही बनवाबनवी या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेली शंतनूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. हा चित्रपट असंख्य वेळा प्रेक्षक पाहातात असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. शंतनू या व्यक्तिरेखेमुळे सिद्धार्थ आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहे.सुशांतचे २००४ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो त्यावेळी केवळ ४० वर्षांचा होता.

सिद्धार्थ रे चे तेलगू अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत लग्न झाले होते. दाक्षिणात्य चित्रपटात शांतीप्रिया यांनी स्वताची ओळख निर्माण केली असुन शुभम आणि शिश्या ही दोन मुल दोघांना त्यांना आहेत. शुभम रेला संगीत आणि मॉडेलिंग क्षेत्राची आवड आहे, तर शिश्याला दिग्दर्शनाची आवड आहे. लेखक म्हणून तो आता हिंदी सृष्टीत स्वताची ओळख निर्माण करताना दिसत आहे. येत्या १ फेब्रुवारी २०२२ रोजी डिजनी हॉट स्टारवर कबीर खुराना दिग्दर्शित Dramayama ही शॉर्ट फिल्म रिलीज होत आहे. या फिल्मचे कथालेखन शिश्याने केले आहे. रिनी सेन मुख्य नायिका तर तारे जमीन पर या गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटातील बालकलाकार दर्शील सफारी या शॉर्टफिल्म मधून मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

सिद्धार्थचे खरे नाव सुशांत रे असून तो व्ही शांताराम यांचा नातू होता. वंश, पहचान, युद्धपथ यांसारख्या चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले नसल्याने त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या तितक्याशा लक्षात राहिल्या नाहीत. पण त्याचा बाजीगर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात त्याने काजोलच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्याच्यावर चित्रीत झालेले छुपाना भी नही आता… हे गाणे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते चरस हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

Leave a Reply