प्रत्येक महिलेने या सुपरफूड्स चा समावेश आपल्या आहारात करून घ्यायलाच हवा, महिलांसाठी आवश्यक असणारे काही सुपरफूड्स…!

0
574

स्त्री व पुरुष समान असले तरीही स्त्रीयांचे शरीर हे पुरुषांच्या शरीराच्या तुलनेमध्ये शारीरिक दृष्ट्या थोडेसे कमकुवत असते. तसेच स्त्रीयांना संपूर्ण आयुष्यात दर महिन्याला येणारी मासिक पाळी, प्रे-ग्नेंसी, बाळंतपण व मेनोपॉज यासारख्या हार्मोनल चेंजेस मधून जावे लागते. याच सर्व गोष्टींचे स्त्रीयांच्या शरीरावर दूरगामी परिणाम होत असतात. हार्मोनल बदलांमुळे स्त्रीयांच्या शरीराची अतिशय मोठ्या प्रमाणावर झीज होत असते. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना सकस आहाराची जास्त आवश्यकता असते.

आहार शास्त्रानुसार अशा काही नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या स्त्रियांच्या शरीराकरता अतिशय आवश्यक व पोषक असल्यामुळे त्यांना महिलांच्या डाएटमध्ये सुपरफुड म्हणून समावेश करणे गरजेचे आहे. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला या सुपरफुड्स बद्दल माहिती देणार आहोत..

ज्या सुपरफुडची महिलांना शारीरिक पोषणासाठी आवश्यकता आहे व असे सुपरफुड महिलांच्या डायेटमध्ये समावेश करणे अत्यावश्यक आहे.

लो फॅट योगर्ट-

Low Fat Yougurt Dahi
लो फॅट योगर्ट म्हणजे कमी स्निग्धता असलेले दही. प्रसिद्ध लेखिका आणि न्यूट्रिशनिस्ट एलिझाबेथ सोमर यांनी आपल्या एज- प्रूफ युवर बॉडी या पुस्तकांमध्ये दही हे ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठी महिलांनी अवश्य सेवन केले पाहिजे याबद्दल लिहिले आहे. तसेच लो फॅट योगर्ट खाल्ल्यामुळे महिलांना पोटा संबंधित ज्या काही त्रासांना सामोरे जावे लागते त्याच्यापासून देखील आराम मिळतो. दही पोटातील अल्सर आणि व्हजायनल इन्फेक्शन चा धोका देखील कमी करण्यास मदत करते. याशिवाय दह्यामध्ये हाडे मजबूत करणारे कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणात आढळते. प्रत्येक वयाच्या स्त्रीयांनी रोजच्या ब्रेकफास्ट, लंच किंवा स्नॅक्स मध्ये रोज एक कप लो फॅट दही खाल्ले पाहिजे.

ओमेगा थ्री फॅटी ऍसिडयुक्त फिश-

omega 3 fatty acid rich fish
सॅल्मन,सार्डिन आणि मॅकरेल सारख्या माशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. या माशांमध्ये इकोसापेंटेनोईक ऍसिड(EPA) आणि डोकोसाहेक्सैनोई ऍसिड (DHA) सुद्धा जास्त प्रमाणात असते. हे मासे खाल्ल्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, हायपर-टेन्शन, डिप्रेशन, जॉईंट पेन आणि इन्फ्लॅमेशन सारख्या आजारांपासून संरक्षण होते. तसेच ओमेगा-३ फॅटी ऍसिड मुळे अल्झायमर सारख्या आजारांपासून देखील महिलांचे संरक्षण होते. आठवड्यातून दोन-तीन वेळेस या फॅटी फिशचा आहारात समावेश केला पाहिजे.

बीन्स-

Beans Vegetable Proteins In Marathi
बीन्समध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते तसेच बीन्स फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे. हृदय रोग व ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्यापासून बीन्स बचाव करते.  प्रसिद्ध  न्यूट्रिशनिस्ट क्रूस यांच्या मते,महिलांनी बीन्स चे सेवन केल्यास त्यांचे हार्मोन्स संतुलित राहतात. त्यांच्यामते बीन्स खाणे महिलांसाठी सर्वाधिक श्रेयस्कर व गरजेचे आह। इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर मध्ये बीन्सच्या अभ्यासाबद्दल संशोधनामध्ये असे आढळून आले आहे, की बीन्स खाणाऱ्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे धोका कमी पाहायला मिळाला आहे. बीन्स मुळे कोलेस्ट्रॉल कमी होते तसेच पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉज मध्ये होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमध्येदेखील बीन्स संतुलन आणते.

लो फॅट मिल्क आणि ऑरेंज ज्यूस-

Low Fat Milk Orange Juice Benifits
कमी स्निग्धता असलेले दूध आणि ऑरेंज ज्युस पिणे महिलांकरता लाभदायक असते. यामध्ये विटामिन डी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आतड्यांमधून कॅल्शिअम शोषण्यात हाडांन मदत करते. विटामिन डी शरीराला ऑस्टियोपोरोसिस पासून वाचण्यासाठी मदत करते. डायबिटीज, मल्टिपल स्केलेरोसिस आणि ब्रेस्ट, पोट तसेच अोव्हरीमध्ये होणाऱ्या गाठींच्या धोक्यापासूनही बचाव करते. बर्‍याच महिलांमध्ये विटामिन डी ची कमतरता असते. दूध, ऑरेंज ज्युसमध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन डी असते.

टोमॅटो-

Tomato Benefits In marathi
टोमॅटो मध्ये असलेल्या लायकोपीन नावाच्या पोषक तत्वांमुळे टोमॅटोला ‘पावर हाऊस’ म्हटले जाते. संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की लायकोपीन मुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो,तसेच हे एक शक्तीशाली एंटीऑक्सीडेंटसुद्धा आहे. यामुळे महिलांमध्ये हृदयाच्या आजारापासून लढण्याची शक्ती मिळते.  सध्याच लागलेल्या संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे, की लायकोपीन मुळे वार्धक्याची लक्षणे देखील कमी होऊ लागतात.

बेरीज-

Berries Blueberry Strawberry Benefits in Marathi
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, कॅन बेरी यांमध्ये अँथोसायन नावाचे अँटी-कॅन्सर पोषकतत्व आढळते. अभ्यासावरून असे निदर्शनास आले आहे की, या तत्त्वामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व पोटाच्या कॅन्सरचा  धोका कमी होतो. या बेरीजमध्ये विटामिन सी आणि फॉलिक ऍसिड मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे महिलांसाठी प्रेग्नेंसी मध्ये खूपच लाभदायक ठरतात. बेरीज मध्ये असलेल्या अँटी-एजिंग तत्त्वांमुळे वाढत्या वयासोबत येणारी वार्धक्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते. बेरीज मुळे महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन देखील कमी होते.

Leave a Reply