सुशांतने गुगलवर या 3 गोष्टी का शोधल्या?

0
698
sushant singh rajput google search

सुशांतच्या मृत्यूची बातमी पसरताच विविध माहिती बाहेर येऊ लागली आहे. सुशांत मानसिक थकवा होता का? नेपोटिझमची चर्चा? आर्थिक नुकसान? मात्र, जसजसे दिवस जात आहे तसे सुशांतचे प्रकरण गुंतागुंतीचे होऊ लागले आहे!

त्याच्या निधनानंतर सुशांतच्या गुगल सर्च आणि इंटरनेट इतिहासाविषयी माहिती समोर आली आहे . मृत्यूच्या दोन दिवस आधी सुशांत त्याच्याबद्दल लिहिलेल्या विविध लेखा इंटरनेट वर शोधत होता असे आढळून आले आहे.

तो आपल्या माजी मॅनेजर दिशाविषयी हि विविध माहिती शोधत होता असे समजते. तसेच सुशांत मानसिक आजाराबद्दल विविध लेख देखील वाचत होता,हे लेख तो का वाचत होता याचा पोलिसांना प्रश्न पडला आहे!

पोलिसांनी या माहितीच्या आधारे सुशांतच्या डॉक्टरांशी चर्चा करणार आहेत, यावरून काही महत्वाची माहिती पुढे येऊ शकते.

Leave a Reply