विद्यार्थ्यांच्या कॉपी प्रकारातला जुगाड पाहता शिक्षक चक्रावले! व्हिडीओ होतोय व्हायरल…

0
421
Teachers were shocked to see the juggling of students copy type The video is going viral

शालेय किंवा महाविद्यालयीन परीक्षा जवळ आली कि विद्यार्थी आधी कॉपी च्या शोधात असतात. कॉपी करायला कशी मिळेल यावरच त्यांचं डोकं जरा जास्त चालू असतं. असाचा काहीसा मजेशीर व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

विद्यार्थी आणि परीक्षेत कॉपी हे हल्ली खूप ठिकाणी सुरु असत. म्हणजेच परिक्षा डोक्यावर आली की अभ्यासाला सुरुवात करायची. आणि कमी वेळात काही तरी कॉपी या प्रकारचा जुगाड करायचा. सध्या अशाच एका कॉपी विद्यार्थ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो कॉपी बहाद्दरांचा मास्तरच निघाला.

प्रत्येक वर्गात अशी काही मुलं असतात, जी केवळ कॉपीच्या जोरावर परीक्षेला बसतात. ते वर्षभर अभ्यास करत नाहीत आणि कॉपीच्या माध्यमातून परीक्षा उत्तीर्ण होतील, असा विचार करतात. दे आता यासंबंधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये परीक्षेपूर्वी विद्यार्थी कॉपी घेऊन परीक्षा हॉलमध्ये पोहोचले नाहीत ना, याची तपासणी केली जात आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये विद्यार्थी रांगेत उभे आहेत, व त्या विद्यार्थ्यांची कॉपी तपासली जात आहे असं दिसून येत आहे. चेकर समोर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्यावर तो ताठ उभा राहतो. मग ते पाहून चेकर त्याची पॅन्ट तपासतो, त्याला तिथेही काही मिळत नाही. सरतेशेवटी त्याने पँटच्या सीलमध्ये रबराच्या सहाय्याने अनेक कॉपी बांधल्याचं दिसून आलं. विद्यार्थ्याच्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

पुढे या व्हिडीओमध्ये चेकर असं काहीतरी बोलताना दिसून येतोय. “त्याला वाटले असेल की तो संपूर्ण सागरच घेऊन जाऊ, त्याला हवं तितकं पाणी प्यायला” असं तो चेकर बोलताना दिसतो. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ memewalanews च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आला आहे. आता हा व्हिडीओ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे की तो खऱ्या घटनेशी संबंधित आहे, यावर अद्याप कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Leave a Reply