तेजश्री प्रधानने दिली चाहत्यांना खुशखबर

0
401
Tejashree Pradhan gave good news to the fans

झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची‘ आणि ‘अग्गाबाई सासूबाई’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनात नाव कोरलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्री शेवटची ‘अग्गाबाई सासूबाई’ मध्ये दिसली होती, तिने शुभ्रा अनिल कामतची भूमिका साकारली होती आणि तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. अग्गाबाई सासूबाई हि मालिका 22 जुलै 2019 रोजी सुरू झाला आणि 13 मार्च 2021 रोजी संपला. या मालिकेत कथा एका विधवेच्या जीवनाभोवती फिरते, जी सर्व समस्यांना संयमाने सामोरे जाते.

Love Rush Web Serias

तेजश्रीने ‘तुझा नी माझा घर श्रीमंताचा’ आणि लेक लडकी या घरची या चित्रपटातही तिने छोट्या भूमिका केल्या. तिने अभिनेता शर्मन जोशीसोबत ‘बबलू बॅचलर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट 22 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित झाला.

तेजश्री प्रधान लवकरच “लव रश” या वेब सिरीझ मध्ये झळकणार आहे. युटूबवर ही सिरीझ पहायला मिळणार आहे. सिरीझमध्ये तिच्यासोबत गौरव घाटणेकर दिसणार असून लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या हिंदी वेब सिरीझची निर्मिती आणि दिगदर्शन देखील तिनेच केली आहे. अतिशय सुरेख संवाद यामध्ये आपणांस ऐकायला मिळणार आहे.तेजश्री प्रधानची हि वेब सिरीज पाहण्यास आपण सर्व उत्सुक असलाच.

Love Rush Episode Love Rush Episode tejashree pradhan

Leave a Reply