तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राच्या नात्यात जोरदार भांडण सत्य काय….

0
417
tejashwi prakash & karan kundra

बिग बॉस 15 च्या घरात दररोज नवीन ड्रामा पहायला मिळत आहे. बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना टास्क दिला आहे जो पूर्ण करण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. बिग बॉसच्या घरातील सध्या एक कपल चांगलेच चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा.. या दोघांची घरातील केमिस्ट्री सर्वांनीच पाहिली आहे.

मात्र दोघांच्या नात्यात आता चांगलाच खटका उडाला आहे. टास्क दरम्यान करण आणि तेजस्वी यांच्या कडाक्याचे भांडण झाले. दोघांनी एकमेकांसोबत भांडण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. मात्र भांडणानंतर तेजस्वीला भयंकर त्रास झाला आहे. तेजस्वीला पाहून घरातील सर्व स्पर्धकांना तिची दया आली.

यानंतर राखी सावंतनं करणला तेजस्वीशी लग्न करण्याचा सल्ला दिला. पण त्यावर करणनं दिलेल्या उत्तरानं सर्वच हैराण झाले आहेत.नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये करण आणि राखी गार्डनमध्ये बसले होते त्यावेळी राखी तेजस्वीचं नाव घेत करणला म्हणाली, ‘मी काय म्हणते, मुलगी चांगली आहे. सर्वकाही चांगलं आहे. मार्चमध्ये तसंही तुला लग्न करायचं आहे. तर मग हिच्याशीच लग्न कर.’ राखी म्हणते.

टास्क दरम्यान घरातील लव्ह बर्ड्स करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात जोरदार भांडण झाले.टास्कवरून दोघांमध्ये सुरू झालेले भांडण इतके वाढले की करण कुंद्राने तेजस्वीवर कॅमेऱ्यासमोर येण्याचे नाटक केल्याचा आरोपही केला. खरंतर, उमर रियाझ शमिता शेट्टी आणि रश्मी देसाई ‘तिकीट 2 फिनाले’ टास्कमध्ये करण कुंद्राच्या वतीने खेळत होते. त्याचवेळी राखी सावंत आणि देवोलिना भट्टाचार्जी तेजस्वी प्रकाशसाठी खेळताना दिसल्या.

Leave a Reply