ठरलं! राणादा आणि अंजलीबाईंचा साखरपुडा उत्साहात पार

0
353

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रमुख भूमिकेत असलेले राणादा आणि पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अचानक साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.अभिनेता हार्दिक याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो आणि अक्षया दोघेही कपल डान्स करताना दिसत आहे.

व्हिडीओत सुरुवातीला ते दोघे हातात हात घालून एंट्री घेतात. त्यानंतर एका गाण्यावर ते दोघे कपल डान्स करताना दिसत आहेत. डान्सनंतर दोघेही एकमेकांच्या बोटात रिंग घालताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना दोघांनी फक्त हार्ट इमोजी टाकला आहे. या व्हिडीओत ते दोघेही फार खुश आणि एकमेकांच्या प्रेमात असल्याचे पाहायला मिळत आहे.

साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अक्षयानं त्याला ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन दिले. अहा म्हणजे या दोघांची आद्याक्षरं आहेत. याशिवाय राणादाने देखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने हे फोटो शेअर करताना त्याला, ‘अखेर साखपुडा पार पडला… #अहा ऽऽऽ’ असं कॅप्शन दिलं होते.

Hardik Joshi And Akshaya Deodhar Engagement Photos –

 

Leave a Reply