‘शेर शिवराज’ला प्राईम टाइम न मिळाल्यानं हा अभिनेता संतप्त

0
363
the-actor-is-angry-that-sher-shivraj-did-not-get-prime-time

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ हा सिनेमा गेल्या 22 एप्रिलला प्रदर्शित झाला. या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे पण सध्या या मराठी चित्रपटालाच महाराष्ट्रात प्राईम टाईमसाठी झगडावं लागतंय आहे. या मुद्यावर अभिनेता अक्षय वाघमारेने पोस्ट लिहुन त्याने त्याचा राग व्यक्त केला होता. मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे, यासारखे दुसरे दुर्दैव नाही, अशा शब्दांत त्याने आपला राग व्यक्त केला आहे

अक्षय वाघमारे यानंतर आता आस्ताद काळेने ही याविरोधत आवाज उठवला आहे. सोशल मीडियावर त्यानेही एक पोस्ट लिहिली आहे, त्यामध्ये आस्ताद ने ही पोस्ट लिहिताना सोबत काही मिळलेल्या स्क्रिनिंग टाइमचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. मराठी सिनेमाला प्राइम टाइम मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन आस्ताद ने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आस्ताद काळेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, अजून किती वर्षं “महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमधे मराठी चित्रपटांनाच योग्य स्थान मिळत नाही” या गोष्टीचा त्रास सहन करायचाय??? किती वर्षं?????आस्तादची ही पोस्ट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत असून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तुम्ही मराठी चित्रपट त्या ताकतीचे बनवा का लोक बघायला येणार नाहीत असे काही यूजर्सचं म्हणणे आहे तर काहींच्या मते ऐवढे उत्कृष्ट दर्जाचे मराठी सिनेमे बनत आहेत.पण थिएटरमध्ये त्यांना योग्य जागा मिळत नाही आहे

आस्ताद काळेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक युजर्सनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीही झालं तरी आम्ही हा चित्रपट पाहणार असं काही युजर्सचं म्हणणं आहे. काहींच्या मते मराठीमध्ये दर्जेदार चित्रपट तयार केले जात नाहीत म्हणून त्यांना प्राइम टाइममध्ये स्थान मिळत नाही. तर काही युजर्सनी आस्ताद काळेला पाठिंबा देत त्याचं म्हणणं बरोबर असल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply