पुष्पा चित्रपटातील ही अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात..

0
353

सध्या देशभरात पुष्पा या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सहाजिकच या चित्रपटांमधील कलाकार नेमके काय करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. नॅशनल क्रश असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमीच चर्चेत असते. रश्मिकाने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोज्, व्हिडीओज् आणि तिचे लाईव्ह सेक्शन्स चाहत्यांच्या मनावर राज करत असतात.

 

‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेत्री फेम रश्मिका मंदान्ना प्रत्येकाच्या हृदयाची धडधड बनली आहे. विशेषतः ‘पुष्पा’ नंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली. रश्मिका ही सध्या अभिनेता विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघेही मुंबईत एकत्र दिसले होते. काही दिवसांपूर्वी ते दोघेही मुंबईत डेटवर जाताना दिसले होते. अलीकडेच अशी चर्चा होती की, रश्मिका मंदान्ना आणि तेलुगु चित्रपटांचा सुपरस्टार विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये असून ते लग्न करणार आहेत.

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या केमिस्ट्रीचे लाखो चाहते आहेत. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात ते एकत्र झळकले होते. या दोन्ही चित्रपटात त्यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले होते. तेव्हापासून रश्मिका आणि विजय यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या.रश्मिका आणि विजय अनेकदा एकमेकांसोबत टाइम स्पेंड करीत असतात, या वर्षाअखेरपर्यंत ते दोघेही विवाहबंधनात अडकतील, असे बोललं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

रश्मिका मंदाना ही सध्या विकास बहल दिग्दर्शित अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तर सध्या विजय देवरकोंडा हा त्याच्या आगामी ‘लाइगर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात अनन्या पांडे स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू आहे.

Leave a Reply