चक्क विमानतळावर डान्स करू लागली ही अभिनेत्री… व्हायरल झाला व्हिडीओ

0
390
The actress started dancing at the airport ... The video went viral

समंथा रुथ प्रभू सध्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ओ अंतवा या गाण्यासाठी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.समंथा प्रभूच्या बोल्ड डान्समुळे लोकांच्या ओठी अजुनही आहेच. या गाण्यामधील समंथाच्या हटके अंदाजाने फक्त साऊथला नाही तर अख्या देशाला वेड लावलं आहे. तिची अ‍ॅक्टिंग,डान्सिंग, स्टाईलवर फिदा आहे. तिच्या फिटनेसचेही चाहते आहेत.

samantharuthprabhu

समंथा रुथ प्रभूने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती विमानतळावर डान्स करताना दिसत आहे.चाहत्यांना तिचा हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. यावेळी तिने एअरपोर्टवर ग्रे क्रॉप टॉप, ब्लॅक रिप्ड जीन्स आणि ब्लू डेनिम जॅकेट परिधान केले होते.’हलामिथी हबीबो’ या गाण्यावर तीने डान्सचा जलवा दाखवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सामंथा किती मोठी फिटनेस फ्रीक आहे, हे नव्यानं सांगायला नको. अर्थात इतकी फिटनेस फ्रीक असूनही सामंथा एका गंभीर आजाराचा सामना करत होती. या आजारपणामुळे तिला काही मोठे सिनेमेही सोडावे लागले होते.

सामंथा रूथ प्रभु आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोटोची घोषणा केली होती. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली सामंथा व नागा चैतन्य यांचं लग्न झालं होतं. तीच्या वर्कफ्रंटबद्ल बोलायचा तर दक्षिणेतील सुपरस्टार थलपती विजय आणि पूजा हेगडे यांच्या अलीकडेच रिलीज झालेल्या गाण्यवरील हा तिचा व्हिडिओ आहे. शकुंतलम आणि कथू वकुला रेंदू काधल या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत सामंथा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Leave a Reply