एकीकडे लगीनसराई सुरू आहे तर एकीकडे गोड बातम्यांचे उधाण. सध्या बघितले तर बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी सगळीकडेच आनंदाचे वारे वाहतायत. अनेक प्रसिध्द कलाकारांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांच आगमन होत आहे. तर कोणाकडे पाळणा हललेला आहे.
टेलिव्हिजन वरच्या मराठी सृष्टीतील छोट्या पडद्यापासून बराच काळ दूर असलेली गोड व सोज्वळ अभिनेत्री मृणाल दुसानिस आता ही आई होणार असल्याची बातमी इंस्टाग्राम वरून दिली आहे. मृणालने दिलेल्या या गोड बातमीवर चाहत्यांसह सेलिब्रिटी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करित आहेत.
मृणाल २५ फेब्रुवारी २०१६ रोजी विवाहबंधनात अडकली. तिच्या पतीचं नाव नीरज मोरे असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो कामासाठी अमेरिकेत असतो. तर मृणाल मालिका विश्वाशी जोडलेली असल्याने तिला काही महिने अमेरिकेत तर काही महिने भारतात वास्तव्य करावं लागत होतं, परंतु ती आणि तिचे पती आता सध्या परदेशातच स्थायिक आहेत. आता सर्वजण उत्सुक आहेत तिच्या येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्यासाठी.