‘पुष्पा’च्या श्रीवलल्ली गाण्याचं परदेशीही चढलं भूत !

0
337
The ghost of Pushpa Srivalli song has also reached foreigners

नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट भेटीस आला होता. आज जवळपास दोन महिने झाले तरी या सिनेमाचा प्रेक्षकांच्या मनातून डोक्यातून हा चित्रपट व या चित्रपटातील गाणी काय डोक्यातून जात नाहीयत. जवळपास सात भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला असून सर्व भाषेत या चित्रपटा ला पसंत केले गेले. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दोन महिने झाले तरी या सिनेमातील गाण्याचं खूळ काय उतरलं नाहीय. देशातच नाही तर या चित्रपटातील गाण्यांची चर्चा परदेशी सुद्धा होत आहे. या सिनेमातील ‘श्रीवल्ली’ (Shrivalli) गाण्याने तर आता संपूर्ण जगाला वेड लावले आहे.

श्रीवल्ली’ गाण्याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे.आता तर या गाण्याचे इंग्रजी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. श्रीवल्ली’चे हे इंग्रजी व्हर्जन डच गायिका एमा हीस्टर्सने आपल्या आवाजात हे गाणे गायले आहे. एमा हीस्टर्स सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेएमाने आजपर्यंत अनेक गाणी गायली आहेत. त्यातलं जगभर प्रसिद्ध असं ‘श्रीवल्ली’गाणं आता नुकतच प्रदर्शित झाल असून हे गाणं आपल्याला आता युटबवर पहायला मिळेल. या इंग्रजी व्हर्जनने युट्यूबवर आतापर्यंत 13 लाखहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत.

पुष्पा’ चित्रपटाचे डायलॉग आणि गाणी इतकी प्रसिद्ध होत आहेत की अनेक परदेशी सेलिब्रिटीही त्यावर व्हिडिओ बनवत आहेत आणि सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत आहेत. संपूर्ण देशाला पुष्पा आणि श्रीवल्ली ने अक्षरशः वेड लावले आहे.

srivalli-pushpa

Leave a Reply