मुलीला जन्म देताच आईचा मृत्यु, जाणून घ्या खरे कारण

0
389
The mother dies as soon as she gives birth to a daughter, find out the real reason

चार दिवसांपूर्वी 19 जानेवारीला रुग्णालयात मुलीला जन्म दिल्यानंतर आई सुहानीचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्या विडीओमध्ये सुहानी आपल्या मुलीला मिठी मारून चुंबन घेताना दिसत आहे. तसेच, सुहानीच्या लग्नाच्या 11 वर्षांनंतर मुलीचा जन्म झाल्याचे मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे. मात्र आईचा गंभीर असून आई किंवा मुलीपैकी एकालाच वाचवता येईल असे त्यात लिहले आहे. अशा परिस्थितीत आईने मुलीला वाचवण्याचा निर्णय घेतला आणि मुलीला वाचवल्यानंतर आईने कायमचे डोळे मिटले असे त्या विडीओमार्फत पसरवले जात आहे.

सुहानीचे सासरे आणि जोधपूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष एनके जैन यांनी सांगितले की, गेल्या तीन-चार दिवसांपासून व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खोटा आहे.त्यातुन चुकीचा संदेश दिला जात आहे. त्यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओसह मेसेजमध्ये सुहानीचे 11 वर्षांनंतर लग्न झाले आणि तिला गंभीर आजार झाला.खरतर चार वर्षांपूर्वी सुहानीचे त्यांच्या मुलाशी लग्न झाले होते आणि तीला कोणताही गंभीर आजार नव्हता. ज्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुहानीच्या मृत्यूनंतर तिचे डोळे दान करण्यात आले.मुलीला जन्म दिल्यानंतर सुहानीचा मृत्यू झाला. सुहानीच्या नेत्रदानामुळे दोन अंधांना दृष्टी मिळणार आहे. एनके जैन यांनी आपल्या सुनेच्या नेत्रदानासाठी समुपदेशक मनोज मेहता यांच्याशी संपर्क साधून नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. तेरापंथ युवक परिषद सरदारपुरा, अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेच्या शाखा परिषदेने नेत्रदानासाठी मदत केली. नेत्रदान विभागाचे प्रभारी कैलाश जैन आणि संयोजक विकास चोप्रा यांनी सांगितले की, कुटुंबीयांची संमती घेण्यात आली आहे. एएसजी आय हॉस्पिटलच्या नेत्रपेढीचे टीम लीडर गोपाल नाथ, तंत्रज्ञ प्रमोद आणि सूरज यांच्यासह त्यांच्या निवासस्थानी पोहोचले, सुहानी चोप्राचे दोन्ही कॉर्निया टीमने मिळवले आहेत, जे दोन अंध व्यक्तींना प्रत्यारोपित केले जातील.

Leave a Reply