नुकताच मराठी सिनेसृष्टीत ‘पावनखिंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला लोकांची लाखोच्या संख्येत पसंती मिळाली आहे. त्यानंतर आता बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा सरसेनापती ‘हंबीरराव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा संपुर्ण महाराष्ट्र जाणून आहे. हंबीरराव महाराजांसोबत अनेक मोहिमे फत्ते करण्यासाठी जात.

मराठी सिनेसृष्टीतील दमदार दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे हे हंबीरराव मोहिते यांच्यावर बेतलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मुहूर्तही ठरला असून प्रवीण तरडे यांनी इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.आता शिवभक्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चाहत्यांसाठी सरसेनापती हंबीरराव ने त्यांचं नाव पोस्टर शेअर केलं असून त्यावर , “जेवढी परिस्थिती बिकट मराठा तेवढा तिखट” असं लिहिलं आहे. त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली असून ‘सरसेनापती हंबीरराव हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरात सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता आपण फक्त दिवस मोजायचे…75 दिवस राहिले….असं कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
