हा अभिनेता दुसऱ्यांदा अडकणार शिबानी दांडेकर सोबत विवाह बंधनात

0
443
Shibani Dandekar And Farhan Akhtar

बॉलिवूडमधील प्रेम प्रकरणांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून फरहान आणि शिबानी ही जोडी देखील चर्चेचा विषय ठरली होती. फरहान अख्तर नेहमी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असताे.

बॉलीवूड अभिनेता आणि गायक फरहान अख्तर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. फरहान आणि शिबानी बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर आणि लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जाते. फरहान आणि शिबानीने कधीही त्यांचे नाते जगासमोर मान्य केले नसले तरी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम नेहमीच व्यक्त होत असते. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे बॉलीवूडमधील सर्वात लाडकं जोडपं आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर आली होती. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, आता या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाय. फरहानने शिबानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना, इंस्टग्राम अकाउंटवर त्यांचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘अगदी मनापासून, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लव्ह यू.’ मागील तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. सोशल मीडियावरील त्यांचा पुजा करतांनाचा फोटो पाहून चाहत्यांनी त्यांना लाईक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

फरहान आणि शिबानी या वर्षी मार्च महिन्यात लग्न करून एकमेकांचा हात कायमचा धरणार आहेत. फरहान आणि शिबानीच्या लग्नाची माहिती इंडस्ट्रीतील एका सूत्रानं बॉलिवूड लाईफला दिलीय. सूत्रानं सांगितलं, की फरहान आणि शिबानी मार्च महिन्यात मुंबईत भव्य लग्न करण्याचा विचार करत आहेत.

Leave a Reply