रुग्णालयातून लता मंगेशकर यांच्याबद्दल समोर आली हि माहिती

0
439
This information about Lata Mangeshkar came to light from the hospital

लता मंगेशकर या महिन्याच्या सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लतादीदींचे वय अधिक असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. 8 दिवसांनंतर लता मंगेशकर यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे.92 वर्षीय लतादिदींना गेल्या आठवड्यात येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या लतादीदींवर उपचार सुरू असून त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉक्टर्स सतत त्यांच्या प्रकृतीसंदर्भात अपडेट देत आहेत. लता मंगेशकर यांना कोरोना आणि निमोनिया झाला आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारण होत आहे. अशा परिस्थितीत चाहते त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लता मंगेशकर यांच्या आरोग्यावर आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. डॉ. प्रतीत समदानी हे त्यांच्यावर उपचार करत आहेत.डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

पूर्ण बर्‍या झाल्याशिवाय त्यांना डिस्चार्ज दिला जाणार नसल्याची माहिती ब्रीच कँडीच्या डॉक्टरांकडून देण्यात आली. दरम्यान आम्ही लता दीदी लवकर बर्‍या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहोत. त्या आम्हाला आईसारख्या आहेत, असे त्यांची धाकटी बहीण आणि सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी सांगितले.

लतादीदींच्या प्रकृतीसाठी मुंबईतील त्यांच्या घरी विशेष पूजेचे आयोजन केले आहे. ई-टाईम्ससोबत बातचित करताना लता मंगेशकरांसाठी आयोजित केलेल्या पूजेबाबत आशा भोसलेंनी सांगितले. आशा भोसले म्हणाल्या की, ‘लतादीदींची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी त्यांच्या घरी शिव शंकरांच्या रुद्र रुपाची स्थापना केली असून पूजा पाठ-पठन सुरू आहे.’

Leave a Reply