शिवरायांच्या या चिमुकल्या मावळ्याने जिंकले सर्वांचे मन; अंकित मोहनच्या लेकाचा महाराजांना मानाचा मुजरा

0
340
This mavala of Shivaraya won the hearts of all Ankit Mohan's son pays homage to Maharaj

‘फत्तेशिकस्त’,’फर्जंद’ आणि ‘पावनखिंड’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता अंकित मोहन सध्या चर्चेत आहे तो त्याच्या मुलामुळे! अंकीतने हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अंकित सोशल मीडियावर सक्रिय असून त्याने काही महिन्यांपूर्वीच त्याची पत्नी अभिनेत्री रुची सवर्ण हिने चिमुकल्या बाळाला जन्म दिला याची माहिती दिलेली. हे बाळ आता ७ महिन्यांचं झालं असून त्यांनी सोशल मीडियावर या बाळाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र, यावेळी अंकितने त्याचे बाळ रुआनचा शेअर केलेला व्हिडीओ कमालीची चर्चेत आला आहे.

अंकितने इन्स्टाग्रामवर रुआनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चिमुकला रुआन छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अंकित त्याच्या चिमुकल्या बाळाला महाराजांसमोर कसं नतमस्तक व्हावं, त्यांना कसा मुजरा करावा हे शिकवत आहे.

 

दरम्यान, “छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज आज तुमचा लहान मावळा ७ महिन्यांचा झाला आहे. त्याच्यावर तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. रुआनला ७ व्या महिन्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. बाळाला प्रेम आणि आशीर्वाद पाठवत राहिल्याबद्दल सर्वांचे आभार,” असं कॅप्शन अंकितने या व्हिडीओला दिलं आहे.

Leave a Reply