प्राजक्ता माळीची उद्धव ठाकरे यांना ‘ही’ विनंती… पहा व्हायरल विडिओ मागची कहाणी

0
366
'This' request to Prajakta Mali's Uddhav Thackeray ... Watch the story behind the viral video

प्रसिध्द मराठी अभिनेत्री आणि निवेदिका प्राजक्ता माळी तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. तर सध्या प्राजक्ता माळीने शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना केलेल्या आवाहनामुळे प्राजक्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. यादरम्यानच प्राजक्ताने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Uddhav_Thackeray

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे. पण आता बोलायला हवे. सर्व मराठी रसिक सुज्ञ आहेत, कोरोना नियमांचं पालन करून ते कलाकृतींचा आस्वाद घेतील अशी आम्हांला खात्री वाटते. आमची विनंती विचारात घ्यावी. सर्वच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. सर्वच नियम बऱ्यापैकी शिथील करण्यात आले असून फक्त चित्रपटगृह आणि नाट्यगृहच ५० टक्के आसनक्षमतेने सुरु आहेत, असे का? असा प्रश्न व्हिडीओतून विचारला आहे. आम्हा सर्वांची अशी नम्र विनंती आहे की शिवजयंती तोंडावर आहे.

१८ फेब्रुवारीला पावनखिंड चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याही चित्रपटावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतील. प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. पण आता सरकारलाच विनंती आहे की, कोरोनाचा रूग्ण संख्या ओसरली आहे. त्या निमित्ताने सर्व शिवप्रेमींना, चित्रपट निर्मात्यांना, सर्व रंगकर्मींना १०० टक्के आसनक्षमतेने सर्व चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु झाली आहेत, ही आनंदाची बातमी द्याल. आम्ही आशा करतोय की १०० टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु व्हावीत. त्याचा आम्हा सर्व कलाकारांना आणि चित्रपट निर्मात्यांना खरच खूप फायदा होईल. ही सरकारला नम्र विनंती.

Leave a Reply