महाराष्ट्र असेंब्लीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवीन सरकारने आज फ्लोअर टेस्टमध्ये यश मिळवले आहे. त्यांना एकूण १६४ मते मिळाली तर महाविकास आघाडीला केवळ ९९ मते मिळाली.असेंब्ली स्पीकरने हा निर्णय जाहीर केला. त्याच वेळी, बहुमत चाचणी जिंकल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया सर्वात जास्त लक्षवेधी ठरली.
फडणवीस म्हणाले, या प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान केलेल्या सर्व सदस्यांचे मी आभारी आहे. १९८० च्या दशकात शिंदे साहेबमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये सक्रियपणे सुरुवात केली. त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि आज राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी 1984 मध्ये कुसुमनगर शाखा प्रमुख म्हणून शिंदे साहेब यांची नेमणूक केली. यानंतर, त्यांनी सामान्य जनतेच्या हक्कांसाठी सतत संघर्ष केला. शिंदे यांनाही अनेक वेळा तुरूंगात जावे लागले. परंतु तरीही जेव्हा दिघे साहेबानी आदेश दिले तेव्हा त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग करत सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले.
माझी टिंगल करण्यात आली
यावेळी महाविकास आघाडीवर टीका करताना फडणवीस म्हणाले, मविआ सरकारची आघाडी अनैसर्गिक होती , ते सरकार टिकणार नाही, हे मला ठाऊक होते. दरम्यान मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावर माझी टिंगल उडवली, पण आता मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. यावेळी एकटा नाही तर यांना सोबत घेऊन आलो.
त्या काळात ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदल म्हणजे हे आहे कि, मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते. ” दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलोने हवा मे उछाले नहीं जाते… कोशिश करने से हर मुश्किल होती है आसान, तकदीर के भरोसे काम टाले नही जाते..” अशा शब्दात फडणवीस यांनी शायरी करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.