श्रीकृष्णाचे ते तीन रहस्य आजपर्यंत कोणी समजू शकले नाही…!

0
533
krishna three secret explained marathi trends

भगवान विष्णूंचा श्रीकृष्ण अवतार, ज्याने जगाला भगवद्गीतेद्वारे अध्यात्माचे महत्त्व समजावले, कर्मयोग शिकवला!  भगवद्गीतेच्या ज्ञानातून मनुष्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये कसे वागायचे व त्यातून बाहेर कसे निघायचे याचा मार्ग सापडत असतो. श्रीकृष्णाने आपल्या अवतारातून न्यायतत्वाची स्थापना केली व जगाला दाखवून दिले की जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती अन्याय होईल, असत्य राज्य करू पाहील तेव्हा तेव्हा भगवान विष्णू वेगवेगळे अवतार घेऊन त्यांना तारण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेईल!

भगवान श्रीकृष्णाने आपल्या अवतार कार्यामध्ये न्यायाची स्थापना करण्याबरोबरच संपूर्ण समाजाला प्रेमाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. आपल्या मनमोहक सावळ्या सुंदर रुपासाठी श्रीकृष्ण ओळखला जातो. आपल्या मनमोहक व नटखट वर्तनामुळे श्रीकृष्ण अवतार अगदी बालपणामध्ये मथुरेच्या गवळणींपासून तर आपल्या सर्च सवंगड्यांनापर्यंत श्रीकृष्ण सर्वांचा आवडता व लाडका होता. श्रीकृष्णाच्या या मोहक रुपासोबत तीन महत्त्वाची रहस्ये आहेत ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.

आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये श्रीकृष्णाच्या या मनमोहक रूपाच्या मागे दडलेले तीन रहस्ये सांगणार आहोत! जर आपण ही श्रीकृष्ण भक्त असाल तर आपल्याला श्रीकृष्णाच्या या रहस्यांबद्दल माहिती घेणे नक्कीच आवडेल!

श्रीकृष्णाचा सुगंध कसा होता?

पुराणशास्त्रामध्ये असे वर्णन मिळते की, श्रीकृष्णाचा सुगंध अतिशय वेगळा आणि मनमोहक होता! श्रीकृष्णाच्या देहाचा सुगंध इतका वेगळा होता की त्यांच्या सुगंधाने त्यांना ओळखता येत होते. अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये याबाबतचे वर्णन देखील आढळून आले आहे की, श्रीकृष्णाच्या अंगाचा सुगंध चंदन आणि रातरानीच्या फुलांसारखा येत असे. तर काही लोक या सुगंधाला अष्टगंध देखील म्हणत असत.

श्रीकृष्णाच्या शरीराचे रहस्य!

भगवान विष्णूंच्या श्रीकृष्ण अवतारामध्ये श्रीकृष्णाने अनेक चमत्कार दाखवले होते, वेळेच्या अगोदर सूर्यास्त करण्याचा चमत्कार, काळ थांबवून ठेवणे,असे चमत्कार त्यांनी लीलया केले होते. याकरता श्रीकृष्णाने ब्रम्हविद्या प्राप्त केलेली होती. तसेच त्यांच्याकडे शरीर बदलण्याची देखील विद्या होती. कधीकधी त्यांचे शरीर अगदी स्त्रियांसारखे मुलायम व कोमल होत, तर कधी वज्राहून कठीण होत असे! तर कधीकधी एखाद्या महाकाय पहाडासारखा त्यांच्या शरीराचा स्पर्श होत असे.  श्रीकृष्ण स्वतः योग विद्या आणि कलारीपट्टु विद्येमध्ये पारंगत होते.

चिरायू भगवान श्रीकृष्ण-

श्रीकृष्ण भगवान विष्णूचा अवतार होते, मात्र त्यांनी एका मनुष्य रूपामध्ये अवतार धारण केला होता.त्यामुळे त्यांना कधी ना कधी तरी आपले शरीर त्यागणे आवश्यक होते. आपल्या मृत्यूच्या वेळी ते अतिशय तरुण होते. वयाच्या ११९ व्या वर्षी जेव्हा श्रीकृष्णाने देहत्याग केला तेव्हा त्यांच्या शरीरावरील एकही केस पांढरा झालेला नव्हता, तसेच त्यांच्या शरीरावर सुरकुत्या व म्हातारपणाची कोणतीही लक्षणे त्यांच्या अंगावर दिसत नव्हती.

तर हे होते भगवान श्रीकृष्णाच्या बाबतचे तीन रहस्य!
या रहस्यांबाबत माहिती आपल्याला कशी वाटली व आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी झाली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply