ठाकरे सरकारचा आज शेवटचा दिवस, एकनाथ शिंदे नवा डाव खेळण्याच्या तयारीत

0
304
Shinde - Thackeray should not be reconciled; 'Ya' MLA's letter to Shiv Sainiks

मुंबई:- शिवसेनेचे नेते व कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिवसेनेला मोठा धक्काच दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी ३३ आमदारांना घेऊन मध्यरात्रीच गुवाहाटीला दाखल झाले आहे. सर्व आमदारांना गुवाहाटीमध्ये रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर राज्यपाल यांची भेट घेण्याची एकनाथ शिंदे यांनी तयारी सुरू केली आहे. स्पेशल विमानामधुन, गुवाहाटीवरून मुंबईमध्ये दाखल होणार आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)च्या ६ तुकड्या मुंबईत दाखल झाल्या असून विमानतळ ते राजभवन प्रवासाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलची कटक सुरक्षा असणार आहे.

uddhav thackeray

अगोदरच शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले असून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची निवड केली. सेनेकडे फक्त १७ आमदार असल्याचे पत्र दिले असून एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्यापेक्षा अधिक आमदार आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे दावा करू शकतात. त्यांच्या दाव्यामुळे शिवसेनेच्या अडचणीमध्ये जास्त वाढ होऊ शकते.

सुरत मुंबईपासून जवळ असल्यामुळे मध्यरात्रीच सर्व आमदारांना गुवाहाटीला जाण्याचा प्लॅन केला. सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना मध्यरात्रीच गुवाहाटीला नेण्यात आलं आहे. तसेच आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे आमदार मोहित भारतीय आणि रवींद्र चव्हाण सुद्धा सोबत होते. बंडखोर आमदारांसोबत मोहित भारतीय आणि रवींद्र चव्हाण हे गुवाहाटीला गेले. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन आम्ही राजकारण करणार, असं माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व आमदार यांची जबाबदारी मोहित खंबोज, संजय कुटे, डोंबिवली आमदार चव्हाण या तीन लोकांवर सर्व समन्वय व सोबत राहण्याच्या सूचनाही दिली आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी खास या तीन लोकांवर ही जबाबदारी दिली आहे. ऑपरेशन लोटस याची चर्चा खूप रंगली आहे. खंबोज, कुटे व चव्हाण हे फडणवीस यांच्या जवळचे मानले जाते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार फडणवीस समवेत थेट संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी कडुन मिळत आहे. सर्व आमदार हे आज पहाटे गुवहाटीला पोहोचले आहे. गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये या सर्व क्आमदारांना ठेवण्यात आले असून हॉेटेलबाहेर मोठा सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Leave a Reply