‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून उर्मिला कोठारेची एग्झिट?

0
447
Urmila Kothare exit from the series Tujhech Me Geet Gaat Aahe

12 वर्षांच्या तपानंतर अभिनेत्री उर्मिला कोठारेने पुन्हा टीव्हीकडे आपल्या अभिनयाचा मोर्चा वळविला. ती सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम करत आहे. प्रेक्षकांना हि मालिका आवडत आहे. मात्र आता मालिकेतून उर्मिला एग्झिट घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये वैदेहीचा (उर्मिला साकारत असलेल्या भूमिकेचे नाव ) मृत्यू दाखवण्यात येतो. उर्मिला मालिका सोडणार असल्याची अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नसून प्रोमो पाहिल्यानंतर असा अंदाज बांधण्यात येत आहे.

प्रेक्षक नाराज?

अवघ्या काही दिवसांतच उर्मिला ही मालिका सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. गायनाच स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेची कथा आहे. यात उर्मिला स्वराच्या आईच्या भूमिकेत आहे. या मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि प्रिया मराठे यांच्याही भूमिका आहेत.

Tujhech Me Geet Gaat Aahe

कोठारे प्रॉडक्शन्स अंतर्गतच काम
उर्मिला या मालिकमुळे चर्चेत आहे. उर्मिलाने आतापर्यंत कोठारे प्रॉडक्शन्स अंतर्गतच काम केलं. आता तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या निमित्ताने ती दुसऱ्या प्रॉडक्शन अंतर्गत काम करत आहे. याच मालिकेदरम्यान उर्मिला आणि आदिनाथ यांच्यात काहीतरी बिनसल्याचीही चर्चा झाली.

Leave a Reply