शिवानी रांगोळेकडे विराजसने मागीतले अद्भूत वेलेंटाईन डे गिफ्ट

0
420
Virajas asked Shivani Rangole for a wonderful Valentine's Day gift

झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या गाजलेल्या मालिकेने कधीच निरोप घेतला. पण या मालिकेतील कलाकार, त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. सध्या मराठी सिनेविश्वात चर्चेत असलेलं कपल म्हणजे विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे . नुकताच त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर कबुली दिली आहे.

Virajas Shivani Rangole

शिवानीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. शिवानीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचा एक सुंदर फोटो शेअर करून ही माहिती दिली, या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर नुकताच विराजस आणि शिवानीने व्हॅलेंटाईन डे साजरा करत गिफ्ट काय हवं असे विराजसला विचारले होते. उत्तर ऐकून शिवानी सध्या चांगलीच टेन्शनमध्ये आली आहे. विराजसने शिवानीकडून तात्या विंचू बाहुला मागीतला , पण तो खोटाखोटा नव्हे तर खरोखरच बोलणारा तात्याविंचू अशी त्याची इच्छा आहे.
त्यामुळे आता मोठी पंचाईत झाली.

shivani rangole weds virajas kulkarni

 

तेव्हापासून विराजस कोणीही गिफ्ट काय हवे तर तो खराखुरा तात्या विंचू हवा असं सांगायचा. अजूनही त्याच्या मनात ती इच्छा कुठेतरी आहेच. तात्याविंचू बाहुला बनवून घेता येईल पण विराजसला बाहुला नव्हे तर खरा तात्याविंचू हवा होता. त्यामुळे अवघड झाले आहे.

Have you seen the new photo shoot of Virajas Kulkarni-Shivani Rangole

दहा वर्षापूर्वी पुण्यात डावीकडून चौथी बिल्डिंग या विराजसने लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या नाटकात शिवानीने काम केले होते. दोघांचे होमटाऊन पुणे असल्याने गाठभेट व्हायची. पुढे दोघेही करिअरसाठी मुंबईत आल्यानंतर मैत्री वाढत गेली आणि प्रेमात रूपांतर झाले.

Virajs Shivani RangoleValentine's Day gift

शिवानी आणि विराजस मागील अनेक दिवसापासून रिलेशनमध्ये आहेत. त्यांचे दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे त्यांच्या रिलेशनबाबत आधीपासूनच सगळ्यांना कल्पना होती. परंतु असा अचानक साखरपुडा करून त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.शिवानी आणि विराजस हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार आहेत. दोघांनीही मालिकांमध्ये काम केले आहे. विराजसने झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ मालिकेत काम केले आहे.

Leave a Reply