मराठी सिनेसृष्टीतील ‘या’ जोडीनं गुपचुप उरकलं आपलं लग्न! व्हिडिओ होतोय व्हायरल

0
352
Virajas Kulkarni Shivani Rangole couple from Marathi Cineworld secretly ended their marriage The video is going viral

गेल्या काही दिवसापासून मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा शाही रीतीने साखरपुडा संपन्न झाला. त्यांनी त्यांच्या या साखरपुड्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते , त्यावर बऱ्याच चाहत्यांनी कमेंट करत लग्न कधी करणार अशा प्रतिक्रीया देखील दिल्या होत्या.

दरम्यान, आता दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांचे लग्न झालेले दिसत आहे. आणि हे लग्न गुपित केले की काय? अशा सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. शिवानी रांगोळी हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात ते दोघं मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहेत, सोबत दोघांच्या गळ्यात वरमाळा सुद्धा आहेत. शिवाय या व्हिडिओमध्ये विराजस शिवानीला मंगळसूत्र घालताना दिसत असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत असून नेटकऱ्यांनी शुभेच्छा आणि अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले आहे.

Virajas Kulkarni Shivani Rangole couple

पण या व्हिडिओ मागचं खरं सत्य असं आहे, विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळी यांनी लग्न केलेले नाही या व्हिडिओ त्यांच्या आगामी जाहिरातीच्या शूटदरम्यानचा आहे. हा व्हिडिओज त्या दोघांनी एकाच वेळी ब्रँडच्या जाहिरातीसाठी शूट केला आहे.

विराजस कुलकर्णी बद्दल बोलायचे झाले तर, माझा होशील ना या मालिकेत मुख्य भूमिका करताना आपण त्याला
पाहिले. तसेच विशेष बाब म्हणजे विराजस कुलकर्णी हा प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. तर शिवानी बद्दल बोलायचे झाले तर तिने बऱ्याच मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशातच बऱ्याचदा शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात.

Virajas Kulkarni weds Shivani Rangole

Leave a Reply